अपघातानंतर तत्काळ प्रथमोपचार महत्त्वाचे: डॉ. कौशिक सरकार

फोंड्यात डॉ. धायमोडकर प्रथमोपचार प्रशिक्षण अकादमी सुरू
First Aid Training Academy  goa
First Aid Training Academy goaDainik Gomantak

फोंडा: एखाद्या औद्योगिक प्रकल्पात काम करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विषय हा महत्त्वाचा ठरतो. उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चुकून घडणाऱ्या अपघातावेळी प्राथमिक उपचार वेळेत पोचणे आवश्‍यक असल्याने सरकारने त्यादृष्टीने कार्यवाही करताना प्रथमोपचारासंबंधी प्राथमिक माहिती असावी यासाठी प्रशिक्षण सुरू केले असल्याचे केंद्रीय खाण निरीक्षक डॉ. कौशिक सरकार यांनी सांगितले.

First Aid Training Academy  goa
फातोर्डा रवींद्र भवनात ‘कॉटन फॅब’ प्रदर्शनाला प्रतिसाद

फोंड्यात इंडियन मेडिकल असोसिएशन फोंडा शाखेच्या सहकार्याने डॉ. धायमोडकर आयएमए प्रथमोपचार प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आली आहे. या अकादमीचे उद्‍घाटन डॉ. कौशिक सरकार यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत काल करण्यात आले. फोंड्यातील आयएमए सभागृह तसेच मिनिनो ट्रेड सेंटर सभागृहात हा कार्यक्रम झाला. संपूर्ण राज्यातील ही पहिलीच प्रथमोपचार प्रशिक्षण अकादमी ठरली आहे.

या कार्यक्रमाला डॉ. रुफीन मोंतेरो, डॉ. संतोष उसगावकर, डॉ. जगदीश काकोडकर, डॉ. ॲरन सुवारिस व डॉ. वल्लभ धायमोडकर उपस्थित होते. डॉ. वल्लभ धायमोडकर यांनी आपले विचार व्यक्त केले, तर डॉ. राजीव उसगावकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com