प्रसाद पानकर
E-Calendar या महिन्याच्या कॅलेंडरसंबंधात चर्चा चालली असता आमची स्टायलिस्ट कॅन्डीसने एक छान, कल्पना मांडली. एक तरुण जोडपे मॉलमध्ये शॉपींग करताना तिला दाखवायचे होते. आपोआपच ‘मॉल द गोवा’ हे आमचे लोकेशन ठरले.
मी लगेच भुवनला (भूवन शेठ) फोन करुन, त्याच्या मॉलमध्ये शूट करण्याची आमची इच्छा त्याच्याकडे प्रकट केली. एक क्षणाचाही विलंब न लागता तिथून ‘हो’ असे उत्तर आले. त्यांची मार्केटिंग मॅनेजर रसीका परब हिच्याशी संपर्क साधल्याबरोबर शुटसाठी आम्हाला हव्या असलेल्या गोष्टींची (शॉपिंग बॅग वगैरे) व्यवस्था झाली.
कॅन्डीस, फोटोग्राफर निखील आणि मी मॉल द गोवामध्ये रेकीसाी पोहचलो. शुटींगच्या प्रक्रियेतला हा सर्वात महत्वाचा भाग होता. आम्ही तिथून समाधानी होऊन परतलो.
आर्यन साळकर आणि अर्चना डिचोलकर हे तुलनेने नवीन मॉडेल असले तरी ठरलेल्या विषयाला शोभणारे होते. ते थोडेसे नवीन असल्यामुळे त्यांच्याबरोबर एक विशेष सत्र घ्यावे लागले. आमच्या काय अपेक्षा आहे हे त्यांना कळणे महत्वाचे होते.
त्यानंतर आमचे वार्डरोब पार्टनर- ‘कवळेकर निओ कलेक्शन’मध्ये कपडे निवडण्यासाठी जाणे आलेच. तिथे ज्याप्रकारचे कलेक्शन आहे त्यातून कॅन्डिसला कपडे निवडणे कठीण जात नाही.
अर्चनासाठी तिने गुलाबी टॉप आणि सैलसर डेनिम तर त्याला काॅन्ट्रास्ट म्हणून आर्यनसाठी सफेद टी-शर्ट आणि कार्गो पॅण्ट निवडली. त्याचा परिणाम तुम्ही छायाचित्रात पाहू शकता. आता आम्ही तयार होतो.
मॉल सर्वांना खुला व्हायच्या आधी आम्हाला शुट पूर्ण करायचे होते. अर्चना तिच्या आईबरोबर माझ्या घरी पहाटे 6.15 वाजता पोहचली. त्यांना घेऊन मी मेकअपसाठी डेसीमाच्या घरी पोहोचलाे. आर्यन तिथे आधीच येऊन पोहोचला होता. कॅन्डीसने डेसीमाला सूचना देऊन ठेवल्या होत्या.
अर्चनाचे हे पहिलेच व्यावसायिक शुट होते. त्यामुळे तिच्या सुंदर चेहऱ्यावर त्याची हूरहूर दिसत होती. डेसीमाच्या जादूई मेकअपने तिला संपूर्ण बदलवून टाकले. मग आर्यनचा मेकअप सुरु करण्यापूर्वी डेसीमाने आम्हा सर्वांसाठी चहाही बनवला.
8 वाजता आम्ही सारे मॉलपाशी पोहोचलो. मॉरिसन आणि कॅन्डीस तिथे आधीच पोहाेचले होते. साखळी सरकारी कॉलेजच्या प्राध्यापिका अनिता जेकबही तिथे पोहचल्या होत्या.
का? तर त्यांना त्यांच्या कॉलेजच्या फॅशन इव्हेंटसाठी अर्चना हवी होती. आपल्या ॲकडमीक कार्यक्षेत्रापलीकडे जाऊन काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे प्रयत्न करतात याचे ते उत्तम उदाहरण होते.
आम्हाला मदत करण्यासाठी तिथला सुरक्षा रक्षक हरिंदरकुमार हजर झाला. त्याच्याकडून आम्ही रिकाम्या शॉपिंग बॅग मिळवल्या आणि त्यात आम्ही आणलेले कपडे भरले.
या छायाचित्राची फ्रेम अाम्ही आधीच निश्चित केलेली असली तरी मॉरीसनने काही वेगळे कोन सुचवले.
त्यापैकी एक तुम्हाला छायाचित्रात दिसतोच आहे. मॉरिसनने लागलीच लाईट्सच्या तयारीला लागला. निखील आणि विशाल मदतीला हाेतेच.
कॅमेरा ॲन्गल ठरला, लाईट्स तयार झाल्या. फोटोग्राफर तयार होता. मॉडेल रोमांचित झले होते आणि आम्हीही तयार होतो. ॲक्शनची वेळ आली होती.
अर्चना आणि आर्यन, दोघेही कॅमेऱ्यासमाेर सफाईने वावरत होती. आर्यनबरोबर मी आधी काम केले होते. अर्चनाबरोबर काम करण्याची ही पहिलीच वेळ होती पण तसे वाटलेच नाही इतकी ती सहजपणे वावरत होती.
शुट कशाप्रकारे होणार आहे हे कळताच दोघांनी थोडा वेळ प्रॅक्टीस केली. रोल होण्यासाठी कॅमेरा तयार झाला. दोघे मॉडेल उत्स्फुर्त होते आणि कॅमेऱ्याने त्यांना अचूक क्षणी कैद केले.
काय सुंदर छायाचित्र होते! टिमवर्कचे फळ असेच मिळते.
शुट संपल्यानंतर आम्ही सरळ कॅफे भोसलेच्या दिशेने निघालो. मिक्स पावभाजी, मिरची भजी आणि ताजा लिंबू-सोडा या गोमंतकीय ब्रेकफास्टचा आस्वादाला पर्याय नाही.
आम्ही सारेच भुकेलो होतो. ब्रेकफास्ट आणि मनमुराद हसणे ही त्या सुंदर सत्राची सांगता होती. दिवस ‘अमॅझिंग’ सुरु झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.