Ponda News | Sonarbaug villagers opposes dam
Ponda News | Sonarbaug villagers opposes damDainik Gomantak

Ponda News: पोलिस आणा नाही तर मिलिटरी आणा, मागे हटणार नाही! सोनारबाग ग्रामस्थांचा निर्धार; उद्या संघर्ष पेटणार

बंधारा उभारू न देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार; फोंडा पोलिसांना निवेदन
Published on

Ponda News: फोंडा तालुक्यातील उसगांव सोनारबाग येथे बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. कुठल्याही परिस्थितीत हा बंधारा बांधू देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. तसे निवेदन आज, सोमवारी फोंडा पोलिसांना स्थानिकांनी दिले आहे.

Ponda News | Sonarbaug villagers opposes dam
Illegal Liquor Seized: सांगे, धारबांदोडा येथे बेकायदा दारू जप्त, अबकारी विभागाची कारवाई

यावेळी निवेदन देणाऱ्यांनी सांगितले की, या बॅरेज डॅमला आम्हा लोकांचा विरोध आहे. कारण बंधारा उभारण्याची प्रक्रिया पूर्णतः बेकायदेशीर आहे. आम्ही माहिती अधिकारांतर्गतही ही माहिती मिळवली आहे.

उद्या हे लोक पोलिस संरक्षणार्थ या कामाला सुरवात करणार आहेत. त्यामुळे आम्ही पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. पोलिस आणा नाहीतर मिलिट्ररी आणा आम्ही मागे हटणार नाही. करो या मरो, हीच आमची घोषणा आहे. उद्या तुम्ही कसे काम करताय ते आम्ही बघतोच.

Ponda News | Sonarbaug villagers opposes dam
Hill Cutting : ‘सीआरझेड’ नियम धाब्यावर बसवत मांद्रेत डोंगरकापणी

ज्या ठिकाणी बंधारा बांधण्यात येणार आहे ती जागा एसटी समुदायातील लोकांची आहे. एसटीसाठीच्या फंडातून हा प्रकल्प होत आहे. या बंधाऱ्यातील पाण्याचा वापर लोकांसाठी नाही तर इतर प्रकल्पासाठीच करण्यात येणार आहे. आम्हाला हा प्रकल्प आमच्या गावात नको.

आम्ही ते करू देणार नाही. आम्ही याला विरोध करत राहू. याचा त्रास स्थानिकांना होणार आहे. हा बंधारा सलाईन वॉटरमध्ये उभारला जात आहे. त्याचा वाईट परिणाम मँग्रुव्हजवर होणार आहे. आमच्या बागांवर, शेतीवर होणार आहे, असे मत स्थानिकांनी यावेळी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com