Illegal Liquor Seized on Goa Karnataka Border: कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तिथे १० मे रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीत मतदारांना लुभावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जात आहे. त्याचा परिणाम कर्नाटकच्या शेजारील गोव्यातही दिसून येत आहे.
त्यामुळेच गोवा-कर्नाटक सीमेवर गेल्या काही काळात बेकायदा मद्य तस्करीचे प्रमाण वाढले असून अशा अनेकांना अबकारी विभागाने पकडलेही आहे. आताही सांगे आणि धारबांदोडा तालुक्यात अबकारी विभागाने बेकायदा मद्य वाहतूक रोखून ताब्यता एकाला ताब्यात घेतले आहे.
अबकारी निरीक्षक रोहित देसाई यांच्या नेतृत्वाखालील अबकारी विभागाने सांगे आणि धारबांदोडा येथे एकास अटक केली आहे. विनय शर्मा असे संशयिताचे नाव आहे. तो २२ वर्षांचा असून मूळचा बिहारचा रहिवासी आहे.
त्याच्याकडून एकूण 6200 रूपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. योग्य परवाना नसताना तो या मद्याची गोव्यातून कर्नाटकडे वाहतूक करत होता. पोलिस त्याची अधिक चौकशी करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.