Goa: गोव्याची माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी निवड होऊ शकते का?

Goa: मोपा विमानतळामुळे उत्तर गोव्यात उत्तम सोय होऊ शकते.
Goa: गोव्याची माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी निवड होऊ शकते का?
Published on
Updated on

Goa: माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी गोव्याची निवड ही योग्य निवड होऊ शकते. कारण राज्यात विमान, रेल्वेची सोय आहे. चांगले रस्ते तयार होत आहेत. मोपा विमानतळामुळे उत्तर गोव्यात उत्तम सोय होऊ शकते.

भारतामध्ये संगणकाचे युग साधारण 1985 पासून सुरू झाले आणि त्याचे श्रेय स्व. राजीव गांधी यांना दिले पाहिजे. कारण त्यांनी संगणक आणि पाच दिवसांचा आठवडा या दोन नवीन गोष्टी भारताला दिल्या आणि त्यात संगणक फायद्याचे ठरले. तर पाच दिवसांच्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीमध्ये काही विशेष फरक पडला नाही.

Goa: गोव्याची माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी निवड होऊ शकते का?
Life: ''एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे''

पण संगणकाच्या आगमनाने देशाला प्रचंड फायदा झाला आणि पुढेही होणार यात मुळीच शंका नाही. जेव्हा संगणक (Computer) भारतात सुरू झाले तेव्हा विरोधकांना वाटत असे की भारतात बेरोजगारीची संख्या वाढणार आहे. संगणकामुळे भारतात उलट रोजगार वाढला आणि पुढेही वाढत राहणार. आज संगणकाचा वापर सर्व क्षेत्रांत होत आहे आणि त्यामुळे रोजगार वाढत आहे. संगणक आधारित अनेक व्यवसाय सुरू झाले आणि आता संगणक हा गरजेची वस्तू झाली आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे भारताच्या औद्योगिक विकासात एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे. या क्षेत्रातून भारताच्या जीडीपीत 9 टक्के वाटा आहे आणि 2025 मध्ये हा आकडा 10 टक्के पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज काढला आहे. या आर्थिक वर्षात साधारण 4.5 लाख नवीन तरुणांना नोकरी मिळाली आणि यात जवळजवळ 2 लाख महिलांचा समावेश आहे. सध्या भारत हा सर्वात मोठा डेटा जनरेटर पैकी असून आणि तरुण टेक्नोसेवी लोकसंख्येचा देश आहे म्हणून मानलं जाते.

Goa: गोव्याची माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी निवड होऊ शकते का?
Environment: भारतात आधुनिक पर्यावरणपूरक वास्तू

गोव्यामध्ये खाण व्यवसाय सरकारच्या प्रयत्नाने सुरू होणार अशी अशा वाटते. पण परत तेवढी उलाढाल होईल यात शंका आहे त्यामुळे रोजगार तसाच निर्माण होणार, याची गॅरंटी देऊ शकत नाही. पर्यटन व्यवसाय हा आता गोव्याचा प्रमुख व्यवसाय बनला आहे. कोरोनामुळे जरा मंदी आली खरी, पण आता त्यातून बाहेर येत आहे. गोव्यात पर्यटनामुळे प्रचंड रोजगार निर्माण होत आहे आणि ते सरकारला फायदेशीर आहे.

सरकारला पाहिजे की गोव्यात नवीन उद्योग आले पाहिजेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला पाहिजे. गोव्यात साक्षरतेचे प्रमाण साधारण 87.88 टक्के आहे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणाची सोय चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे गोव्यातील शिकलेला युवकाला चांगल्या नोकरीची अपेक्षा असते.

Goa: गोव्याची माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी निवड होऊ शकते का?
Flood in Sattari : सत्तरी पुराच्या छायेत जाण्यामागची नेमकी कारणं काय?

सरकार काही सर्व जणांना सरकारी नोकरी देऊ शकत नाही. त्यामुळे खासगी क्षेत्रांत नोकरी निर्माण करणे हे सरकारचे कर्तव्य असते आणि त्यासाठी सरकारच्या प्रयत्नामुळे खासगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे. गोव्यात माहिती तंत्रज्ञानवर आधारित असलेल्या उद्योगधंद्यात गोव्यातील कुठल्याही शाखेतील पदवीधर काम करू शकतो.

आज प्रत्येक शाळा-महाविद्यालयत संगणकांवर आधारित सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्सेस मुलांना दिले जातात. पदवीधर मुलांना महाविद्यालयात काही शाखेत माहिती-तंत्रज्ञान विषय सक्तीचा असतो तर काही ऐच्छिक असतात. पण प्रत्येक विद्यार्थी हा संगणक शिक्षित असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगधंद्यात नोकरी मिळण्यास गोव्यातील मुलांना सहज शक्य आहे.

Goa: गोव्याची माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी निवड होऊ शकते का?
Goa Karnataka Migration : गोवा का होतंय कर्नाटकाची वसाहत?

माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी गोव्याची निवड ही योग्य निवड होऊ शकते. कारण गोव्यात विमान, रेल्वेची सोय आहे. चांगले रस्ते तयार होत आहेत, मोपा (Mopa) विमानतळामुळे उत्तर गोव्यात चांगली सोय होऊ शकते. इतर राज्यांपेक्षा गोव्यात कामगार वर्ग कमी पगारात मिळू शकतो. गोव्यातील नागरिक शिक्षित असल्यामुळे त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे.

तसेच गोव्यातील लोकांची राहणीमान काही प्रमाणात पश्‍चिम देशाशी जुळत असल्यामुळे बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्यासाठी गोव्यातील युवक हा चांगला ॲड्जस्ट होऊ शकतो. यामुळे गोवा हा माहिती-तंत्रज्ञानाला आधारित उद्योगाला चांगला पर्याय होऊ शकतो. गोवा सरकारदेखील माहिती-तंत्रज्ञानावर आधारित उद्योगाला प्रोत्साहन देते. कारण हा व्यवसाय पर्यावरणाला हानिकारक नाही. त्यात प्रदूषण होण्याची अजिबात शक्यता नाही.

Goa: गोव्याची माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी निवड होऊ शकते का?
Taxi App will be launched in Goa : गोवा सरकार लवकरच लॉन्च करणार नवं टॅक्सी अॅप

त्यामुळे अशा उद्योगधंद्यांना गावातील लोकांकडून विरोध होणार नाही, याची खात्री सरकारला आहे. माहिती-तंत्रज्ञानावर आधारित कंपनीत चांगला पगार देतात. त्यामुळे गोव्यातील युवा वर्गाना एक चांगली संधी मिळू शकते. काही कंपन्या हार्डवेअरमध्ये काही पार्टस उत्पादन करतात. त्यामुळे रोजगार जास्त प्रमाणात होऊ शकतो. तर काही कंपन्या सॉफ्टवेअरमध्ये सेवा पुरवतात. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात रोजगार निर्माण होतो.

गोवा सरकारने (Goa Government) उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने 4 कंपन्यांकडे सामंजस्य करार (एमओयू) सही करून महाविद्यालयातील मुलांना त्या कंपनीकडून प्रशिक्षण दिले जाईल व त्यांना इतर कंपन्यात नोकरी दिली जातील. सरकारचा उद्देश हा की गोव्यातील मुलांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता खासगी कंपनीत नोकरी करावी किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. यासाठी लागणारे सहकार्य सरकार देण्यास तयार आहे.

सरकारची जबाबदारी असते की राज्यात रोजगार निर्माण करणारे व्यवसाय आणावेत किंवा जे आहेत त्यांची वाढ करावी. आता आपले आयुष्य तंत्रज्ञानावर आधारित चालले आहे. गोवा सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान मार्गदर्शानानुसार पुढील काळात या उद्योगांत वाढ होण्याची संभावना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com