Environment: भारतात आधुनिक पर्यावरणपूरक वास्तू

Environment: सध्याचे युग हे जागतिक तापमानवाढीचे आहे.
Environment
EnvironmentDainik Gomantak
Published on
Updated on

Environment: ग्रीन बिल्डिंग म्हणजे बाहेरून हिरवा रंग दिलेली इमारत नव्हे; तर जी बांधताना, वापर करताना,  दुरुस्ती करताना किंवा मोडताना पर्यावरणाला कमीच कमी बाधा पोचवते ती. हिरवा रंग पर्यावरणाशी जोडल्यामुळे त्याला ग्रीन म्हणतात.

सध्याचे युग हे जागतिक तापमानवाढीचे आहे. हरितगृह वायूंची अतोनात वाढ झालेली आहे. त्यामुळे तापमान सतत वाढू लागल्याने हवामान बदल घडू लागलेले आहेत. सध्या तरी पाऊस जास्त व अनियमित पडू लागलेला आहे. भविष्यात तो कदाचित कमी पडून दुष्काळ ही पडू शकतो.

Environment
Flood in Sattari : सत्तरी पुराच्या छायेत जाण्यामागची नेमकी कारणं काय?

तापमानवाढ जर अशी होत राहिली तर अंटार्क्टिक किंवा आर्क्टिक येथील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढून देशांच्या किनाऱ्याजवळचा  बराचसा भूभाग कायमचा बुडू शकतो. अशा ह्या अनियमित परिस्थितीला अनेक कारणे  आहेत व त्याला अमेरिकेसारखे  प्रगत पाश्चात्य देश सगळ्यात जास्त जबाबदार आहेत. ते एकदम प्रगत असल्या कारणाने तिथे अनेक क्षेत्रांत  हरितगृह वायू मोठ्या प्रमाणावर (22 टक्के) तयार होतात.

फक्त बांधकाम (Construction) क्षेत्रापुरते मर्यादित बोलायचे म्हणजे त्यांचे हवामान अतिशय थंड असल्या कारणाने हिवाळ्यात तिथे घरे उबदार ठेवण्यासाठी प्रत्येक निवासी घरांत/इमारतींत  गॅस किंवा पेट्रोलवर चालणारे बंब वापरले जातात. त्याशिवाय  जगात सर्वसाधारण  सिमेंट  उत्पादन जे होते, या दोघांचा मिळून   प्रचंड प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड तयार होतो व हे तापमानवाढीचे हे एक  मुख्य कारण समजले जाते. या दोघांचा  वाटा जागतिक तापमानवाढीत पंचवीस टक्केचा जवळपास आहे असा अंदाज आहे.

Environment
The Anglo-Portuguese Treaty : उद्ध्वस्त करणारा अँग्लो-पोर्तुगीज करार!

आपल्या देशांत कडाक्याची थंडी पडणारे प्रदेश जास्त नाहीत व आहेत तिकडे अशा प्रकारचे  बंब  जास्त वापरले जात नाही. त्यामुळे भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांतील  बांधकामक्षेत्राचे   तापमानवाढीत योगदान अत्यल्प आहे (2.5 टक्के).  पण या अतिशय भेडसावणाऱ्या जागतिक समस्येमुळे पर्यावरणपूरक इमारती ही एक संकल्पना पुढे आली. याला इंग्रजीत ग्रीन बिल्डिंग म्हणतात.

ग्रीन बिल्डिंग म्हणजे  बाहेरून हिरवा रंग दिलेली इमारत नव्हे,  तर  जी बांधताना, वापर करताना,  दुरुस्ती करताना किंवा मोडताना पर्यावरणाला (Environment) कमीच कमी बाधा पोचवते ती. हिरवा रंग पर्यावरणाशी जोडल्यामुळे त्याला ग्रीन म्हणतात. हे शास्त्र अजून थोडे नवे असल्याने  बांधकामक्षेत्रांत कार्बनचा प्रभाव कमी करण्यासाठी  जगभर सतत संशोधन चालू असते.

Environment
Goa Karnataka Migration : गोवा का होतंय कर्नाटकाची वसाहत?

नवी  बांधली जाणारी इमारत किंवा घर जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कशी होईल याच्यावर अनेक मार्गदर्शक तत्वे आज आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत. गोव्याच्या संदर्भात जर ती पाहिली  तर  यात आपण आपले योगदान देण्यास खालील गोष्टी करू शकतो:-

  • जेव्हा इमारत बांधून पूर्ण केली जाते तेव्हा  पुष्कळ बांधकाम कचरा तयार होतो, जो पर्यावरणाला बाधक असतो व त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी लागते. हल्लीच काही दिवसांपूर्वी सरकारने हा कचरा विल्हेवाट लावायची सुविधा जाहीर केलेली आहे.

Environment
Goa Politics: मुंबईत फडणवीस भेट; खरी कुजबूज
  • पुष्कळ बांधकाम साहित्य  पर्यावरण अनुकूल असते. जसे मिश्रित सिमेंट (slag किंवा flyash), कोळशाच्या राखेच्या विटा (fly ash bricks), लाकुड पर्यायी  साहित्य वगैरे जे वापरल्याने  पर्यावरणहानी नियंत्रित केली जाऊ शकते. 

  • शुद्ध वास्तूशास्त्राप्रमाणे ऐसपैस बरोबर दिशेने खिडक्या ठेवल्या तर घरात चांगला वारा व प्रकाश खेळू शकतो. तसेच  खिडकीला किंवा भिंतीला  जर वर खांचा ठेवल्या की गरम झालेला वारा आपसूक बाहेर निघून जातो व त्यामुळे आतील वातावरण पण चांगले  थंड रहाते आणि वातानुकुलीत यंत्रणा वापरायची जास्त गरज पडत नाही. वीज (Electricity) व पाणी बचत करणारी उपकरणे वापरल्याने एकुणएक विजेची बऱ्यापैकी बचत होऊन जाते.

  • तसेच, जे शौचालयातून मलमुत्र किंवा स्नानगृह/स्वयंपाक घरातील सांडपाणी निघून जाते, ते प्रक्रिया करून परत अक्षरशः पिण्याच्या लायकीचे बनवण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. त्याशिवाय ते यंत्र खत पण तयार करते. आता पिण्याबद्दल सोडा, पण असले पाणी पुष्कळ इतर  कामासाठी वापरले जाऊ शकते. असले एकत्रित केलेले पाणी बांधकाम क्षेत्रांत वापरण्यास सक्तीचे केल्यास सगळ्या पाण्याची वासलात लागून महाग अशा पिण्याच्या शुद्ध पाण्याचे संवर्धन होईल, जे बांधकामाला व इतर न पिण्याच्या कामाला वापरले जाते. त्याशिवाय असले मलमुत्र व सांडपाणी जमिनीत जाऊन जमीन किंवा भुजलाचे  प्रदूषण होते ते  पण बंद होईल.

Environment
Sonsodo Project: सोनसडोचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
  • गोव्यामध्ये अतोनात पाऊस पडतो व तो शेवटी एक तर जमिनीमध्ये लुप्त होतो किंवा समुद्राला जाऊन मिळतो. वेगवेगळ्या पद्धतींनी जर त्याचे संवर्धन केले तर भूजल पातळी  उंचावण्यास मदत होईल व त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतील पाण्याटंचाई  बरीचशी सुटू शकते.

  • आज गैरपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रांत सौरऊर्जा सहज वापरली जाऊ शकते. त्यातील सर्वात साधा उपयोग म्हणजे सौरबंब वापरून पाणी गरम करणे. पण तीच सौरऊर्जा थोड्या मोठ्या प्रमाणावर वापरून आपण घरी वीजनिर्मिती करून स्वयंपूर्ण होऊ शकतो तशीच अतिरिक्त वीज विकू शकतो.

  • स्वयंपाक घरात जो ओला  कचरा (Garbage) तयार होतो, त्याचे घरी बसल्या सहज  गांडूळ खत तयार होऊन जाते, जे आपण घरी पण वापरू शकतो किंवा विकू शकतो. त्यामुळे शहराच्या कचरा व्यवस्थापनवरचा ताण पुष्कळ कमी होऊ शकतो. इमारतीच्या अवतीभवती किंवा कुठे शक्य असेल तिथे झाडे लावून नैसर्गिक प्रकृती वाढवून, सावली मिळवून जागेच्या  तापमानात कपात केली जाऊ शकते.

भारतामध्ये हरितगृह वायूंची तेवढी समस्या नाही जेवढी पाश्चात्य देशांत आहे. पण पृथ्वी सगळी एकच असल्या कारणाने जागतिक तापमान वाढीचा फटका  सगळीकडे समान जाणवतो. त्यासाठी जगभरच्या देशांनी व जनतेने त्याला  हातभार लावणे गरजेचे आहे. आपण बांधकाम क्षेत्रांत जर असा खारीचा वाटा उचलला तर ही समस्या ‘थेंबे थेंबे तळे साचे’ पद्धतीने जगभर कमी व्हायला  पुष्कळ मदत होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com