Life: ''एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे''

Life: सुखाची कल्पना जशी व्यक्तीगणिक बदलते, तसेच कशात जास्त सुख वाटते आणि कशात कमी याबद्दलचे निष्कर्षही व्यक्तिनिष्ठ असतात.
Life
LifeDainik Gomantak
Published on
Updated on

सुखाची कल्पना जशी व्यक्तीगणिक बदलते, तसेच कशात जास्त सुख वाटते आणि कशात कमी याबद्दलचे निष्कर्षही व्यक्तिनिष्ठ असतात. कुणाला खाण्याची खूप आवड असते, कुणाला भटकंतीची. कुणाला चित्रपट बघण्यात आनंद मिळतो तर कुणाला वाचनात. मग ‘अधिकांचे अधिक सुख’ कशात आहे ते कशाच्या आधारे ठरवायचे? उपयुक्ततेच्या तत्त्वाचे व्यवहारात पालन कसे करता येईल? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत.

‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ या वचनामध्ये सुख-दु:खाला जणू आकारमान असल्याप्रमाणे त्यांची तुलना केली आहे. ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ हीदेखील अशीच तुलना. पण सुखांचे परिमाण ठरवण्यासाठी काही वस्तुनिष्ठ निकष वापरणे शक्य होईल का? नीतिमीमांसेत विज्ञानात (Science) असते तशी वस्तुनिष्ठता आणता येईल का?

Life
Environment: भारतात आधुनिक पर्यावरणपूरक वास्तू

या प्रश्नांचा विचार करून बेंथम यांनी सुखाचे मोजमाप करण्यासाठी सात निकष सुचवले. ते असे : समीपता, कालावधी, तीव्रता, निश्चितता, निर्मितीक्षमता, शुद्धता आणि विस्तार. बेंथम मानतात की, वेगवेगळ्या सुखांमध्ये गुणात्मक फरक नसतो. असतो तो संख्यात्मक. हे निकष सुखांच्या परिमाणांची तुलना करण्यासाठी उपयोगी आहेत असा बेंथम यांचा विश्वास आहे. यातले अनेक निकष आपण कळत-नकळत वापरतच असतो.

‘हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये’ हा वाक्प्रचार पुढे कधीतरी मिळणाऱ्या सुखाच्या नादात जे सुख निकटच्या काळात मिळणार आहे ते गमावू नये असे सांगतो. जास्त काळ टिकणारे सुख तात्कालिक सुखापेक्षा बरे असे आपल्याला वाटते. पण कधी-कधी थोडा वेळ टिकणारे पण अतिशय उत्कट, तीव्र सुख जास्त वेळ राहणाऱ्या सुखापेक्षाही हवेसे वाटते.

Life
Flood in Sattari : सत्तरी पुराच्या छायेत जाण्यामागची नेमकी कारणं काय?

जे सुख मिळणार हे निश्चित असते, त्याचे मूल्य जे सुख मिळणे अनिश्चित असते त्यापेक्षा अधिक असते. काही सुखे अशी असतात की त्यांमधून नवीन सुखांची निर्मिती होते. काही सुखे अशी असतात की त्यांच्यामध्ये काही प्रमाणात तरी दुःख मिसळलेले असते. त्यामुळे त्यांची शुद्धता काहीशी कमी होते. सुख जेवढे जास्त निर्भेळ, तेवढे ते जास्त चांगले.

आत्तापर्यंत ज्या निकषांची चर्चा आपण केली, ते सगळे एका व्यक्तीच्या सुखासंबंधीचे आहेत. पण शेवटचा ‘विस्तार’ हा जो निकष आहे, तो मात्र इतर व्यक्तींच्याही सुखांच्या संदर्भातला आहे. हा निकष असे सांगतो की फक्त वैयक्तिक सुखापेक्षा जे सुख अधिक लोकांना सुख देते ते सुख अधिक श्रेष्ठ. हे सात निकष ‘सुख-कलन/गणित’ म्हणून ओळखले जातात.

Life
The Anglo-Portuguese Treaty : उद्ध्वस्त करणारा अँग्लो-पोर्तुगीज करार!

ते वापरून सुखांचे तुलनात्मक मूल्यमापन करता येते. बेंथम यांच्या सिद्धांतात लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे समानतेचे तत्त्व समाविष्ट केलेले आहे. बेंथम असे ठामपणे सांगतात की व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्थिती, राजकीय स्थान काहीही असली तरी प्रत्येकाच्या सुखाचे मूल्य समान असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com