Mauvin Godinho | App based Taxi in Goa
Mauvin Godinho | App based Taxi in GoaDainik Gomantak

Taxi App will be launched in Goa : गोवा सरकार लवकरच लॉन्च करणार नवं टॅक्सी अॅप

गोवा सरकारचं वाहतूक खातं आणि पर्यटन खातं मिळून हे खास टॅक्सी अॅप तयार करणार आहेत.
Published on

Taxi App will be launched in Goa : गोवा सरकार लवकरच 'गोवा टॅक्सी' नावाचं अॅप लॉन्च करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आणि माविन गुदिन्हो यांची गोव्यातील टॅक्सी प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीत नवीन अॅप लॉन्च करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात गोव्यात पर्यटकांसह सर्वसामान्य गोवेकरांनाही अॅप बेस्ड टॅक्सीचा अनुभव घेता येणार आहे.

गोवा सरकारचं वाहतूक खातं आणि पर्यटन खातं मिळून हे खास टॅक्सी अॅप तयार करणार आहेत. या अॅपच्या कामासाठी एका कंपनीसोबत बोलणीही सुरु असून गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड ही कंपनी नवीन टॅक्सी अॅप तयार करणार आहे. नववर्षाआधीच हे अॅप लॉन्च करण्याचा सरकारचा मानस असून या अॅपमध्ये गोव्यातील सर्व टॅक्सीचालकांना सामावून घेतलं जाणार असल्याचं माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केलं.

Mauvin Godinho | App based Taxi in Goa
Goa Online Taxi Service : दाबोळीत 15 ऑक्टोबरपासून टॅक्सी ॲप सेवा सुरू

दरम्यान गोवा माईल्स या अॅप बेस्ड टॅक्सी सेवा काउंटरचा शुभारंभ सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आला. वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात या सेवेला सुरुवात करण्यात आली आहे.

गोवा माईल्स काऊंटरच्या उद्घाटनापूर्वी एकाने या काऊंटरला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अटक करत 151 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com