
भारतातील लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ज्युपिटर 110 स्कूटरचे नवीन स्पेशल एडिशन भारतीय बाजारपेठेत (Indian Market) लॉन्च केले. 'स्टारडस्ट ब्लॅक स्पेशल एडिशन' असे नाव असलेल्या या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 93,031 रुपये आहे. हे मॉडेल जुन्या टॉप-स्पेक डिस्क एसएक्ससी व्हेरिएंटपेक्षा अधिक आहे, ज्यामुळे हे आतापर्यंतच्या ज्युपिटर 110 मॉडेल्समधील सर्वात महागडे मॉडेल बनले आहे.
नवीन टीव्हीएस ज्युपिटर स्टारडस्ट ब्लॅक एडिशनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचे आकर्षक डिझाइन आणि रंगसंगती. क्रोमच्या एक्झॉस्ट हीट शील्डचा अपवाद वगळता, ही स्कूटर पूर्णपणे काळ्या रंगात (ब्लॅक) येते. यामुळे स्कूटरला एक प्रीमियम आणि स्पोर्टी लूक मिळाला आहे. स्कूटरवरील कंपनीचे लोगो आणि इतर सर्व बॅजिंगही काळ्या रंगाचे आहेत. मात्र, स्कूटरच्या मॉडेलचे नाव ब्राँझ रंगात देण्यात आले आहे. हे वैशिष्ट्य स्कूटरला इतर व्हेरिएंट्सपासून वेगळे करते, कारण इतर मॉडेल्समध्ये क्रोम बॅजिंगचा वापर केला जातो. हा ब्राँझ रंग काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतो, ज्यामुळे स्कूटर अधिक आकर्षक वाटते.
दरम्यान, या स्पेशल एडिशनमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणेच 110 सीसी सेगमेंटमधील दमदार इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये 113.3 सीसी क्षमतेचे एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 7.91 बीएचपी (ब्रेक हॉर्सपॉवर) आणि 9.80 एनएम (न्यूटन मीटर) चा कमाल टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत जोडलेले आहे, ज्यामुळे रायडिंगचा अनुभव अत्यंत आरामदायक आणि गियरलेस राहतो. डिस्क एसएक्ससी मॉडेलप्रमाणेच ज्युपिटर स्टारडस्ट ब्लॅक स्पेशल एडिशनमध्ये किक-स्टार्ट फीचर नाही, मात्र, हे फीचर शोरुममध्ये अॅक्सेसरी म्हणून खरेदी करता येते.
नव्या स्कूटरमध्ये रायडिंगचा उत्तम अनुभव मिळावा यासाठी मजबूत सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. स्कूटरमध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक हायड्रॉलिक फ्रंट सस्पेन्शन आणि मागील बाजूस ट्विन-ट्यूब इमल्शन शॉक ॲब्जॉर्बर आहेत, ज्यात 3-स्टेप ॲडजस्टेबल सिस्टीम आहे. त्यामुळे खराब रस्त्यांवरही स्कूटरची रायडिंग स्मूथ राहते. ब्रेकिंगसाठी, पुढच्या चाकात 220 मिमी डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात 130 मिमी ड्रम ब्रेकचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे सुरक्षित ब्रेकिंग मिळते.
याशिवाय, या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये एलईडी हेडलाइट आणि टेललॅम्पसह इलेक्ट्रिक सायलेन्स स्टार्ट सिस्टीमसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. मात्र, या मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्मार्ट कनेक्ट कनेक्टिव्हिटी फीचर. यामध्ये व्हॉइस असिस्टंट, डिस्टन्स टू एम्प्टी, व्हेहिकल ट्रॅकिंग, सरासरी इंधन वापर (फ्यूल कन्सम्प्शन), कॉल आणि एसएमएस नोटिफिकेशन्स आणि नेव्हिगेशन सपोर्ट यांचा समावेश आहे. हे फीचर्स रायडरला प्रवासादरम्यान (Travel) अधिक सोयीस्कर बनवतात.
स्कूटरबद्दल आणखी बोलायचे झाल्यास, तिची लांबी 1,848 मिमी, रुंदी 665 मिमी आणि उंची 1,158 मिमी आहे. याचा व्हीलबेस 1,275 मिमी आणि ग्राउंड क्लीअरन्स 163 मिमी आहे. टीव्हीएसने आपल्या लोकप्रिय ज्युपिटर मॉडेलला प्रीमियम लूक आणि आधुनिक फीचर्स देऊन बाजारपेठेत आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.