Manish Jadhav
ओडिसी इलेक्ट्रिक कंपनीने पुन्हा मोठा धमाका केला. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर Odysse Sun भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केली.
Odysse Sun ची सुरुवातीची किंमत 81,000 आहे, तर टॉप मॉडेल 91,000 पर्यंत आहे. ही स्कूटर बजेट सेगमेंटमध्ये शानदार पर्याय ठरु शकते.
या स्कूटरमध्ये दोन वेगवेगळ्या क्षमतेचे बॅटरी पॅक मिळतात. 1.95 kWh आणि 2.9 kWh.
लहान बॅटरीसह ही स्कूटर 70 किमी प्रति तास इतका वेग आणि 85 किमीपर्यंतची रेंज देते. तर मोठ्या बॅटरीसह ही रेंज 130 किमीपर्यंत वाढते.
स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 4.5 तास लागतात, ज्यामुळे ती रोजच्या वापरासाठी सोयीची ठरते.
स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक, की-लेस स्टार्ट-स्टॉप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सुरक्षिततेसाठी डबल फ्लॅश रिव्हर्स लाईट यांसारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
स्कूटरमध्ये दोन ड्रायव्हिंग मोड्स- एक पार्किंग मोड आणि दोन रिव्हर्स मोड असे पर्याय आहेत. यामुळे शहरांमधील गर्दीमध्ये स्कूटर चालवणे सोपे होते.
Odysse Sun मध्ये 32-लीटर अंडर-सीट स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. हे स्टोरेज Ola S1 Air (34 लीटर) च्या जवळपास आहे, तर TVS iQube आणि Ather Rizta पेक्षा जास्त आहे.