TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

New TVS Scooter: कंपनी लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार असून त्याचे नाव ‘ऑर्बिटर’ असण्याची शक्यता आहे. ही शानदार स्कूटर 28 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे लॉन्च केली जाऊ शकते.
New TVS Scooter
TVS OrbiterDainik Gomantak
Published on
Updated on

New TVS Scooter: भारताच्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या आगामी स्कूटरचा पहिला टीझर जारी केला आहे. कंपनी लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार असून तिचे नाव ‘ऑर्बिटर’ असण्याची शक्यता आहे. ही शानदार स्कूटर 28 ऑगस्ट रोजी अधिकृतरित्या लॉन्च केली जाऊ शकते. टीझरमध्ये ‘इलेक्ट्रिफायिंग’ (Electrifying) या शब्दाचा प्रयोग केल्याने आणि व्हिडिओमध्ये लाइट्स दिसल्याने ही एक इलेक्ट्रिक स्कूटरच असल्याचे स्पष्ट होते.

एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर

यापूर्वीच, कंपनीने ‘ऑर्बिटर’ या नावासाठी ट्रेडमार्क दाखल केला होता. ‘ऑर्बिटर’ व्यतिरिक्त कंपनीने ‘ईव्ही-वन्स’ आणि ‘ओ’ यांसारख्या नावांचेही पेटंट घेतले आहे. कोणताही अधिकृत खुलासा झाला नसला तरी असे मानले जात आहे की, ही एक एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर असेल. याचा अर्थ फीचर्स आणि किंमत दोन्ही बाबतीत ही स्कूटर कंपनीच्या सध्याच्या iQube मॉडेलपेक्षा कमी असेल. यामुळे कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी ही एक चांगला आणि परवडणारा पर्याय ठरु शकते.

New TVS Scooter
Electric Scooter: हाय स्पीड आणि दमदार रेंजसह Odysse Sun लॉन्च; ओला-TVS ला देतेय तगडी टक्कर!

डिझाइनमध्ये नावीन्य

कंपनीने दाखल केलेल्या डिझाइन पेटंटनुसार, नवीन स्कूटरच्या डिझाइनमध्ये काही गोष्टी iQube लाइनअपशी मिळत्याजुळत्या आहेत. पण एकूणच नवीन स्कूटरचे डिझाइन अधिक स्लिम आणि आकर्षक असण्याची शक्यता आहे. स्कूटरच्या पुढच्या बाजूला नवीन एलईडी हेडलॅम्प असेल, जे एलईडी डे-टाइम रनिंग लॅम्पसह सुसज्ज असेल. हे सर्व डिझाइन घटक जुन्या iQube ची आठवण करुन देणारे असतील.

New TVS Scooter
Cable TV Operators: वीजखांबांच्या वापरासाठी 30 लाख शुल्क, केबल ऑपरेटर्सकडून आव्हान; न्यायालयाकडून दिलासा नाही

स्पर्धेला मिळेल नवे आव्हान

नुकताच टीव्हीएसने iQube चा एक नवीन 3.1 kWh बॅटरीचा व्हेरिएंट 1.03 लाख रुपये (एक्स-शोरुम) किमतीत लॉन्च केला. हा नवीन व्हेरिएंट भारतीय इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजारपेठेत वाढत असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आणला गेला. कंपनीने सांगितले की, हे शानदार मॉडेल एका चार्जमध्ये 123 किमीची रेंज देते.

दरम्यान, या नवीन ‘ऑर्बिटर’ स्कूटरच्या लॉन्चमुळे टीव्हीएस आता इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारपेठेत अधिक आक्रमकपणे उतरणार आहे. एंट्री-लेव्हल सेगमेंटमधील ग्राहक (Customer) मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होत असून ‘ऑर्बिटर’ त्यांना एक चांगला पर्याय ठरु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com