Time Magazine ने केली जगातील 100 प्रभावशाली कंपन्यांची यादी जाहीर; रिलायन्स, टाटा अन् सिरमचा दबदबा!

Time Magazine: जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या टॉप 100 यादीत या तिघांचाही समावेश करण्यात आला आहे.
mukesh ambani & ratan tata
mukesh ambani & ratan tata

Time Magazine: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजशिवाय सायरस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि टाटा समूहाने प्रसिद्ध अमेरिकन मॅगझिन टाइममध्ये स्थान मिळवले आहे. जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या टॉप 100 यादीत या तिघांचाही समावेश करण्यात आला आहे. टाइम मॅगझिनने 2024 या वर्षातील जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. ही यादी 5 श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये लीडर्स, डिसप्टर्स, इनोव्हेटर्स, टायटन्स आणि पायोनियर्स यांचा समावेश आहे. प्रत्येक श्रेणीत 20 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.

रिलायन्स कोणत्या श्रेणीत?

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स आणि टाटा समूहाला टायटन्स श्रेणीत स्थान मिळाले आहे. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची पायोनियर श्रेणीसाठी निवड झाली आहे. टाईम मॅगझिनने रिलायन्सला 'इंडियाज जगरनॉट' ही पदवी दिली आहे. मॅगझिनमध्ये रिलायन्सबद्दल लिहिण्यात आले की, टेक्सटाइल आणि पॉलिस्टर कंपनी म्हणून सुरु झालेली रिलायन्स आज एक मोठा उद्योग समूह आहे. तसेच, भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. कंपनीचे एनर्जी, रिटेल आणि टेलीकॉम यासह अनेक व्यवसाय आहेत.

mukesh ambani & ratan tata
Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

डिस्ने डीलचा उल्लेख

टाईम मॅगझिनेही रिलायन्स आणि डिस्ने डीलचा उल्लेख केला आहे. मॅगझिनचे म्हणणे आहे की, 8.5 अब्ज डॉलरचा हा करार भारताच्या वेगाने वाढणाऱ्या स्ट्रीमिंग मार्केटवर रिलायन्सची पकड मजबूत करेल.

mukesh ambani & ratan tata
Mukesh Ambani बनले जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली CEO; एलन मस्क आणि सुंदर पिचाई यांना सोडले मागे

सिरम इन्स्टिट्यूट आणि टाटा ग्रुप

टाईम मॅगझिने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून समावेश केला आहे. टाटा समूहाबाबत टाईममध्ये लिहिले आहे की, ‘’हा समूह भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक आहे. त्याचा पोर्टफोलिओ स्टील, सॉफ्टवेअर, घड्याळे, मीठ, धान्य, एअर कंडिशनर्स, फॅशन आणि हॉटेल्सपर्यंत विस्तारित आहे. टेक मॅन्युफॅक्चरिंग, एआय आणि सेमीकंडक्टर चिप्समध्ये गुंतवणूक करुन हा समूह एक टेक कंपनी बनत आहे. 2023 मध्ये, आयफोन असेम्बली करणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरली.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com