Mukesh Ambani बनले जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली CEO; एलन मस्क आणि सुंदर पिचाई यांना सोडले मागे

Worlds Most Powerful CEOs: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ब्रँड गार्डियनशिप इंडेक्समध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहेत.
Mukesh Ambani
Mukesh AmbaniDainik Gomantak
Published on
Updated on

Mukesh Ambani Second Position Among Worlds Most Powerful CEOs: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ब्रँड गार्डियनशिप इंडेक्समध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहेत. तर जगात ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्समध्ये चीनस्थित टेन्सेंटचे हुआतेंग मा (Huateng Ma) पहिल्या स्थानावर आहेत. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 मध्ये अंबानींना ही रँक मिळाली आहे. 2023 च्या क्रमवारीतही ते जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होते. अंबानींनंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, ॲपलचे सीईओ टिम कुक आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क आहेत.

दरम्यान, टाटा समूहाचे सीईओ एन. चंद्रशेखरन हे महिंद्रा ग्रुपचे अनिश शाह यांसारख्या अनेक भारतीयांपेक्षा पुढे होते. हा निर्देशांक ब्रँड फायनान्सने तयार केला आहे. यामध्ये चांगल्या आणि शाश्वत पद्धतीने व्यवसायासाठी काम करणाऱ्यांना जागतिक स्तरावर मान्यता दिली जाते. कोणता सीईओ सर्वांना बरोबर घेऊन चालला आहे, हे ही या क्रमवारीत लक्षात घेतले जाते. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आता ‘विविध’ गटांच्या श्रेणीतील सर्वोच्च क्रमांकाचे सीईओ आहेत.

Mukesh Ambani
Mukesh Ambani यांना 400 कोटींच्या खंडणीसाठी धमकावणारा गजाआड

अंबानींना किती गुण मिळाले?

न्यूज एजन्सी IANS च्या वृत्तानुसार, ब्रँड फायनान्सच्या सर्वेक्षणात मुकेश अंबानी यांना BGI स्कोअर 80.3 देण्यात आला, जो चीनच्या Huateng Ma यांच्या 81.6 पेक्षा थोडा कमी आहे. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स जगातील CEO चे मूल्यमापन करते, ज्यानुसार ते सर्व भागधारक-कर्मचारी, गुंतवणूकदार आणि व्यापक समाजाच्या गरजा संतुलित करुन शाश्वत मार्गाने व्यवसाय मूल्य कसे निर्माण करतात.

ब्रँड फायनान्सनुसार, ब्रँड गार्जियनची भूमिका ब्रँड आणि व्यवसाय मूल्य तयार करणे आहे. शाश्वत भविष्यासाठी भागीदारी निर्माण करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ही जागतिक ओळख आहे. ब्रँड फायनान्स उपायांच्या संतुलित स्कोरकार्डचे अनुसरण करते. अलीकडे ब्रँड फायनान्सने प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल 500 – 2024’ या ताज्या अहवालात, Jio – हा तुलनेने नवीन ब्रँड – LIC आणि SBI सारख्या अनेक दशक जुन्या भारतीय ब्रँडच्या पुढे भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखला गेला. ब्रँड फायनान्सच्या 2023 च्या रँकिंगमध्ये भारतातील मजबूत ब्रँड्समध्ये Jio ने देखील अव्वल स्थान मिळवले आहे.

Mukesh Ambani
Mukesh Ambani Threatened: उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचा मेल; "आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर"

पेटीएमला अडचणीतून बाहेर काढणार अंबानी?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी पेटीएम घेणार आहेत. अशा अहवालानंतर जिओ फायनान्शिअलच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाली आहे. जिओचे बाजार भांडवल 1.87 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र, आतापर्यंत जिओने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवानाही रद्द होण्याची शक्यता आहे. पेटीएममध्ये अनियमितता आढळल्यानंतर आरबीआयने त्यावर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com