Mukesh Ambani: चेअरमनच्या खुर्चीचा हा कसला पेच? मुकेश अंबानी 5 वर्षे घेणार नाहीत पगार

Mukesh Ambani: अंबानी (66) मुख्य कार्यकारी पदासाठी कंपनी कायद्यानुसार आवश्यक असलेली 70 वर्षे वयोमर्यादा ओलांडतील.
Mukesh Ambani
Mukesh AmbaniDainik Gomantak
Published on
Updated on

Reliance Industries Limited: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मुकेश अंबानी यांना पुढील पाच वर्षांसाठी शून्य वेतनासह कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून नियुक्त करण्यासाठी शेअरधारकांची परवानगी मागितली आहे.

या नवीन कार्यकाळात, अंबानी (66) मुख्य कार्यकारी पदासाठी कंपनी कायद्यानुसार आवश्यक असलेली 70 वर्षे वयोमर्यादा ओलांडतील, त्यामुळे पुढील नियुक्तीसाठी शेअरधारकांच्या विशेष ठरावाची आवश्यकता आहे.

दरम्यान, एका विशेष ठरावात रिलायन्सने एप्रिल 2029 पर्यंत कंपनीचे अध्यक्ष म्हणून अंबानी यांची नियुक्ती करण्यासाठी शेअरधारकांची संमती मागितली आहे. अंबानी 1977 पासून रिलायन्सच्या (Reliance) संचालक मंडळावर आहेत आणि त्यांचे वडील आणि समूह संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर जुलै 2002 मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष झाले.

Mukesh Ambani
Mukesh Ambani आणि अनिल अंबानी यांना मोठा दिलासा, SEBI ने दिला 'हा' निर्णय!

शेअरधारकांना पाठवलेल्या एका विशेष ठरावात, रिलायन्सने सांगितले की, त्यांच्या संचालक मंडळाने 21 जुलै 2023 पासून पुढील पाच वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून मुकेश अंबानी यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

ठरावात म्हटले आहे की, अंबानी यांनी त्यांचे वार्षिक वेतन 2008-09 ते आर्थिक वर्ष 2019-20 पर्यंत 15 कोटी रुपये निश्चित केले होते. त्यानंतर, 2020-21 या आर्थिक वर्षापासून त्यांनी कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) आपला पगार सोडण्याचा निर्णय घेतला.

Mukesh Ambani
Mukesh Ambani: मुकेश अंबानींनी 24 तासात कमावले 19,000 कोटी, अब्जाधीशांच्या यादीत...

दुसरीकडे, आर्थिक वर्ष 2020-21 पासून त्यांना सलग तीन वर्षे कोणतेही वेतन आणि नफा-आधारित कमिशन दिले गेले नाही. "अंबानींच्या विनंतीनुसार, बोर्डाने शिफारस केली आहे की 19 एप्रिल 2024 ते 18 एप्रिल 2029 या प्रस्तावित कालावधीसाठी त्यांना कोणतेही वेतन किंवा नफा-आधारित कमिशन देऊ नये," असे ठरावात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com