RIL AGM 2023: मोठी घोषणा! रिलायन्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये अंबांनींची पुढची पिढी

ईशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाश अंबानी यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात येणार असल्याची माहिती रिलायन्सकडून देण्यात आली आहे.
Mukesh Ambani
Mukesh AmbaniDainik Gomantak
Published on
Updated on

RIL AGM 2023: रिलायन्स एजीएम 2023 ला संबोधित करताना मुकेश अंबानी यांनी आज अनेक घोषणा केल्या. ईशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाश अंबानी यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात येणार असल्याची माहिती रिलायन्सकडून देण्यात आली आहे.

नीता अंबानी बोर्डापासून विभक्त होणार

संचालक मंडळाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची बोर्डावर गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. आता नीता अंबानी संचालक मंडळापासून विभक्त होणार आहेत.

Mukesh Ambani
Mukesh Ambani आणि अनिल अंबानी यांना मोठा दिलासा, SEBI ने दिला 'हा' निर्णय!

फॉर्च्युनच्या यादीत रिलायन्स 88 व्या स्थानावर आहे

सध्या रिलायन्स 2023 च्या फॉर्च्युन यादीत 88 व्या स्थानावर आहे. ही "जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची" ग्लोबल 500 यादी आहे.

रिलायन्स (Reliance) ही सध्या भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. याशिवाय, कंपनी फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत 45 व्या स्थानावर आहे. यासोबतच जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत रिलायन्स पहिल्या क्रमांकावर आहे.

बेस्ट वर्क कल्चरमध्ये अव्वल

जर वर्क कल्चरबद्दल बोलायचे झाल्यास, रिलायन्सला 20 सर्वोत्तम कंपन्यांमध्ये बेस्ट वर्क कल्चर कंपन्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

याशिवाय, लिंक्डइनने जारी केलेल्या टॉप कंपन्यांच्या 2023 च्या यादीत रिलायन्सचे नाव टॉप 25 मध्ये समाविष्ट आहे.

Mukesh Ambani
Mukesh Ambani यांनी घेतले कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट लोन, जाणून घ्या

कंपनीचा निव्वळ नफा किती आहे?

रिलायन्स ही भारतातील (India) खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या कालावधीसाठी, कंपनीचा एकत्रित महसूल रु. 9,74,864 कोटी, रोख नफा रु. 1,25,951 कोटी आणि निव्वळ नफा रु. 73,670 कोटी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Mandovi River Casino Dispute
Venus Jupiter Conjunction June 2026
environmental impact of Mopa airport Goa
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com