Ration Card: मोदी सरकारचा राशनकार्डधारकांना मोठा झटका, बंद केली 'ही' सुविधा!

Free Ration Scheme: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात करदात्यांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
Ration Card Holders
Ration Card HoldersDainik Gomantak

Free Ration Scheme: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात करदात्यांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे, गरिबांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

यावेळी अर्थमंत्र्यांनी मोफत राशन योजनेत मोठा बदल केला असून, त्याचा थेट परिणाम देशभरातील गरिबांवर होणार आहे. तर सरकारने रेल्वेला बजेटच्या नऊ पट तरतूद केली आहे. त्याचबरोबर अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरणाच्या बजेटमध्ये कपात करण्यात आली आहे.

बजेट 30 टक्क्यांनी कमी

2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, खाद्य आणि सार्वजनिक वितरणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 30 टक्क्यांनी कमी करुन 2,05,513 कोटी रुपये करण्यात आली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार, 2023-24 चा अर्थसंकल्पीय अंदाज 2,05,513 कोटी रुपये आहे, जो 2022-23 च्या 2,96,303 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा 30 टक्के कमी आहे.

Ration Card Holders
Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, यापुढे या लोकांना मिळणार दुप्पट राशन

दोन लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत

तसेच, सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना 1 जानेवारी 2023 पासून कॅलेंडर वर्ष संपेपर्यंत मोफत राशन पुरवठा सरकार (Government) करणार आहे. यावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचा खर्च सरकार उचलणार असून या योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) असे नाव देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com