Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Ration Card Latest News: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गंत (PMGKAY) देशातील 80 कोटी लोकांना दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत दिला जात आहे.
Narendra Singh Tomar
Narendra Singh Tomar Dainik Gomantak
Published on
Updated on

Ration Card Latest News: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गंत (PMGKAY) देशातील 80 कोटी लोकांना दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत दिला जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने चालवलेली ही योजना कोविड दरम्यान एप्रिल 2020 मध्ये सुरु करण्यात आली होती. सप्टेंबर 2022 मध्ये सरकारने सातव्यांदा डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली. डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरु आहे, मात्र ही योजना पुढे नेण्यासाठी शासनाकडून कोणताही निर्णय झालेला नाही.

शासनाकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा

सरकारकडे (Government) गव्हाचा पुरेसा साठा नसल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. अशा परिस्थितीत जानेवारीपासून मोफत राशन योजना बंद केली जाऊ शकते. अलीकडेच एका केंद्रीय मंत्र्याने सांगितले की, सरकारकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. यासोबतच यंदा गव्हाचे उत्पादनही चांगले येण्याची शक्यता आहे. आता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी PMGKAY वर मोठी अपडेट शेअर केली आहे.

Narendra Singh Tomar
Ration Card: राशनकार्डधारकांना मोठा झटका, लवकरच बंद होणार 'ही' योजना

3.9 लाख कोटी रुपयांचे मोफत अन्नधान्य दिले

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले की, मोदी सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल 2020 पासून लोकांना 3.9 लाख कोटी रुपयांचे मोफत अन्नधान्य दिले आहे. एप्रिल 2020 मध्ये सुरु झालेली ही योजना सातव्यांदा डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तोमर पुढे म्हणाले की, कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांमुळे गरिबांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी PMGKAY सुरु करण्यात आली होती.

Narendra Singh Tomar
Ration Card: एका दिवसात बनवता येणार राशनकार्ड, दुसऱ्या दिवसापासून मिळणार 'राशन'!

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत, 3.90 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह आतापर्यंत 1,118 लाख टन अन्नधान्य राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वाटप करण्यात आले आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, सरकारने 2021-22 मध्ये एमएसपीवर 2.75 लाख कोटी रुपयांच्या पिकांची विक्रमी खरेदी केली आहे. तोमर पुढे म्हणाले की, 'एक देश एक राशन कार्ड' योजनेमुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com