NPS Pension Scheme: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, एनपीएसबाबत सरकार बनवत आहे 'हा' प्लॅन

NPS Pension Scheme: सरकारकडून देशभरातील पेन्शनधारकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत.
National Pension Scheme
National Pension SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

NPS Pension Scheme: सरकारकडून देशभरातील पेन्शनधारकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. यातच आता PFRDA कडून सर्व बँक शाखांमध्ये NPS सुविधा उपलब्ध करुन देण्याची योजना आखली जात आहे, जेणेकरुन प्रत्येकाला पेन्शनचा लाभ सहज मिळू शकेल.

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) चे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी सांगितले की, NPS पेन्शन लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सर्व बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

खेड्यापाड्यातील लोकांनाही याचा लाभ घेता येणार आहे

मोहंती म्हणाले की, प्राधिकरणाने नवीन पेन्शन प्रणाली (NPS) च्या वितरणासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि बँक प्रतिनिधींना जोडले आहे, जेणेकरुन खेड्यापाड्यातील आणि लहान शहरांमधील लोकांनाही या पेन्शन योजनेचा लाभ सहज मिळू शकेल.

PFRDA ने NPS च्या विक्रीसाठी जवळपास सर्व बँकांमध्ये सहभाग घेतला आहे.

National Pension Scheme
NPS Pension: सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला मिळेल दरमहा 2 लाखाची पेन्शन, जाणून घ्या

असे माध्यमांना सांगितले

मोहंती यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पेन्शन उत्पाद एनपीएस लोकांना सहज उपलब्ध होण्यासाठी आम्ही ते सर्व बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत.

आम्ही या विषयावर देखील चर्चा केली आहे, पण शेवटी निर्णय बँकांनाच घ्यावा लागेल.

तुम्ही RRB कडून NPS चे फायदे देखील घेऊ शकता

त्यांनी पुढे म्हटले की, आम्ही NPS 'मॉडेल' अंतर्गत खेडे आणि लहान शहरांमधील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांचा (RRBs) समावेश केला आहे.

अशा प्रकारे, आता RRB कडून देखील NPS घेता येईल. याशिवाय, बँक प्रतिनिधी (बँकिंग करस्पाँडंट) मार्फत एनपीएस घेण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

National Pension Scheme
Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेसाठी 24 सप्टेंबरला भारत यात्रेचे आयोजन; शिक्षक, सरकारी कर्मचारी होणार सहभागी

13 लाख भागधारक जोडण्याचे लक्ष्य

मोहंती म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात खाजगी क्षेत्रातून NPS अंतर्गत एकूण 13 लाख भागधारक जोडण्याचे आमचे लक्ष्य आहे, तर गेल्या आर्थिक वर्षात आम्ही 10 लाख भागधारक जोडले होते.

अधिकृत डेटावरुन प्राप्त माहिती

अधिकृत आकडेवारीनुसार, 16 सप्टेंबर 2023 पर्यंत NPS शी जोडलेल्या लोकांची एकूण संख्या 1.36 कोटी होती (NPS Lite वगळता). अटल पेन्शन योजनेतील ग्राहकांची संख्या पाच कोटी आहे.

PFRDA APY आणि NPS चे व्यवस्थापन करते

PFRDA NPS आणि अटल पेन्शन योजना व्यवस्थापित करते. अटल पेन्शन योजनेत, जिथे योगदानाच्या रकमेच्या आधारावर पेन्शन निश्चित केली जाते. त्याचवेळी, NPS मध्ये, वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर, एकूण कॉर्पसच्या किमान 40 टक्के पेन्शन उत्पाद खरेदी करणे अनिवार्य आहे.

National Pension Scheme
National Pension Scheme: सरकारी नोकरी न करताही पेन्शन हवी असेल तर.... ही बातमी तुमच्यासाठी

अनेक देशांमध्ये जीडीपीच्या 100 टक्क्यांहून अधिक

NPS मध्ये निवृत्तीवेतनाची रक्कम निश्चित न करण्यासंबंधीच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, पेन्शन दीर्घकाळ निश्चित करणे व्यावहारिक नाही. काही विकसित देशांमध्ये जिथे पेन्शन फंड हा सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 100 टक्के किंवा त्याहून अधिक आहे, तिथेही याबाबत समस्या आहे.

भारतात, EPFO ​​च्या पेन्शन उत्पादनांसह सर्व प्रकारच्या पेन्शन संबंधित मालमत्ता, जीवन विमा इ. जीडीपीच्या 16.5 टक्के आहेत. त्याचवेळी, NPS आणि अटल पेन्शन योजनेतील निधी GDP च्या 3.6 टक्के आहे.

पीएफआरडीएच्या अध्यक्षांनी माहिती दिली

PFRDA चेअरमन म्हणाले की, NPS वरील परतावा खूप चांगला आहे हे निश्चित आहे आणि लोक दीर्घकाळात चांगल्या निधीची अपेक्षा करु शकतात.

PFRDA च्या म्हणण्यानुसार, पेन्शन योजनांच्या अंतर्गत इक्विटीमध्ये केलेल्या गुंतवणुकीने सुरुवातीपासून 12.84 टक्के परतावा दिला आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या बाबतीत, NPS मधून परतावा 9.4 टक्क्यांपर्यंत आहे.

National Pension Scheme
EPFO Higher Pension Scheme: पेन्शनधारकांचे बल्ले-बल्ले, उद्यापासून 'या' लोकांना मिळणार पेन्शन; परिपत्रक जारी!

NPS मध्ये कमिशन कमी आहे

दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात मोहंती म्हणाले की, एनपीएस विक्रीचे कमिशन कमी आहे. यामुळे, एजंट किंवा पीओपी (पॉइंट ऑफ प्रेझेन्स) म्हणजेच बँका एनपीएस उत्पादन विकण्यासाठी अधिक आकर्षित होणार नाहीत, परंतु ग्राहकांना फायदा व्हावा म्हणून ते कमीत कमी किमतीचे उत्पादन ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

National Pension Scheme
Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत आली मोठी अपडेट, गॅरंटी नसलेली 'एनपीएस' बंद करा; सरकारने...

आता तुम्हाला किती कमिशन मिळेल?

सध्या, बँका आणि इतर पीओपींना खाजगी क्षेत्रात NPS खाते उघडल्यावर योगदानाच्या अर्धा टक्के कमिशन मिळते. यामध्ये कमिशनची किमान मर्यादा 30 रुपये आणि कमाल 25 हजार रुपये आहे.

त्याचवेळी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (नागरिकांसाठी आणि दोन स्तरावरील खात्यांसाठी) NPS खाते उघडण्यावर कमिशन 0.20 टक्के आहे. यामध्ये किमान मर्यादा 15 रुपये आणि कमाल 10,000 रुपये आहे.

दुसर्‍या प्रश्नाला उत्तर देताना मोहंती म्हणाले की, एनपीएस आणि एपीवाय अंतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्ता चालू आर्थिक वर्षात किमान 12 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे, जो सध्या 10.22 लाख कोटी रुपये आहे.

एकूण व्यवस्थापित निधीमध्ये APY चा हिस्सा सुमारे 35,000 कोटी रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com