NPS Pension: सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला मिळेल दरमहा 2 लाखाची पेन्शन, जाणून घ्या

NPS Retirement Planning: वृध्दापकाळात प्रत्येकाला खर्चाची चिंता सतावते.
Money
MoneyDaINIK Gomantak
Published on
Updated on

NPS pension Calculator: वृध्दापकाळात प्रत्येकाला खर्चाची चिंता सतावते. जर तुम्हालाही तुमचा वृध्दापकाळ सुरक्षित करायचा असेल, तर तुम्ही आधीच नियोजन करायला हवे. ज्या दिवसापासून तुमची नोकरी सुरु होईल त्या दिवसापासूनच तुम्ही निवृत्तीसाठी पैसे वाचवायला सुरुवात करावी. वास्तविक, जितक्या लवकर तुम्ही बचत करायला सुरुवात कराल तितके पैसे तुम्हाला निवृत्तीपर्यंत मिळतील. तुमच्यासाठी EPF, NPS, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट इत्यादीसारख्या सेवानिवृत्ती निधी जमा करण्यासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

सरकार अनेक योजना राबवत आहे

तुम्हाला तुमच्या निवृत्तीचा काळ सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आखल्या आहेत, जिथे तुम्ही गुंतवणूक करु शकता. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा एक मोठी रक्कम पेन्शनच्या रुपात मिळेल याचाही विचार केला पाहिजे. परंतु यासाठी तुम्हाला आजपासूनच गुंतवणूक करावी लागेल.

Money
Government Job 2022: 5000 हून अधिक पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी, अर्जासाठी शेवटचे 2 दिवस बाकी

NPS योजना काय आहे

नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही एक सरकारी पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये इक्विटी आणि डेट दोन्ही साधनांचा समावेश आहे. एनपीएसला सरकारकडून हमी मिळते. निवृत्तीनंतर अधिक मासिक पेन्शन मिळविण्यासाठी तुम्ही NPS योजनेत गुंतवणूक करावी.

आयकर सवलत

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सुकन्या समृद्धी योजना इत्यादींप्रमाणेच NPS पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे. यामध्ये कोणताही गुंतवणूकदार मॅच्युरिटी रकमेचा योग्य वापर करुन मासिक पेन्शनची रक्कम वाढवू शकतो. NPS च्या माध्यमातून तुम्ही वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कर सूट मिळेल.

Money
Government Jobs: इंडियन आर्मी ते रेल्वे, सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर

2 लाख रुपये मासिक पेन्शन दिली जाईल

तुम्ही NPC मध्ये 40 वर्षांसाठी दरमहा 5000 रुपये जमा केल्यास तुम्हाला 1.91 कोटी मिळतील. यानंतर तुम्हाला मॅच्युरिटी रकमेच्या गुंतवणुकीवर 2 लाख मासिक पेन्शन मिळेल. या अंतर्गत, तुम्हाला सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP) मधून 1.43 लाख रुपये आणि 63,768 रुपये मासिक परतावा देखील मिळेल. यामध्ये, गुंतवणूकदार (Investors) जिवंत असेपर्यंत वार्षिकीमधून 63,768 रुपये मासिक पेन्शन मिळत राहील.

20 वर्षात 63,768 रुपये मासिक पेन्शन

तुम्ही 20 वर्षे ते सेवानिवृत्तीपर्यंत प्रत्येक महिन्याला 5000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 1.91 कोटी ते 1.27 कोटी एकरकमी मॅच्युरिटी रक्कम मिळेल. यानंतर, तुम्हाला 6% रिटर्नसह 1.27 कोटी रुपये दरमहा 63,768 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.

Money
केंद्रीय विद्यापीठात सरकारी नोकरीच्या संधी

NPS चे दोन प्रकार आहेत

NPS चे दोन प्रकार आहेत, NPS टियर 1 आणि NPS टियर 2. टियर-1 मध्ये किमान गुंतवणूक 500 रुपये आहे, तर टियर-2 मध्ये ती 1000 रुपये आहे. तथापि, गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. NPS मध्ये गुंतवणुकीचे तीन पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदाराला त्याचे पैसे कुठे गुंतवले जातील हे निवडायचे आहे. इक्विटी, कॉर्पोरेट लोन आणि सरकारी रोखे. इक्विटीच्या अधिक एक्सपोजरसह, ते उच्च परतावा देखील देते. तुमच्या गुंतवणूक (Investment) सल्लागाराशी बोलल्यानंतरच तुम्ही कोणतीही गुंतवणूक करावी हे लक्षात ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com