Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेसाठी 24 सप्टेंबरला भारत यात्रेचे आयोजन; शिक्षक, सरकारी कर्मचारी होणार सहभागी

23 रोजी भारत यात्रा पोळेमार्गे गोव्यात दाखल होणार आहे.
Pension Scheme
Pension SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Pension Scheme अखिल भारतीय भारतीय शिक्षक फेडरेशनद्वारे देशभरात जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

24 सप्टेंबर रोजी दिवसभर राज्यातील विविध भागात यात्रा व सभेचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षक व सरकारी कर्मचारी या यात्रेत सहभाग घेणार असल्याचे गोवा राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष कमलाकर देसाई यांनी सांगितले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम नाईक, कादर शेख, सोनिया माणगावकर, उमेश नाईक, कल्पना परब, संभाजी राऊत, सतीश प्रभुगावकर, प्रकाश गावकर व इतर सभासद उपस्थित होते.

देसाई म्हणाले, 23 रोजी भारत यात्रा पोळेमार्गे गोव्यात दाखल होणार आहे. 24 रोजी सकाळी 9 वाजता काणकोण येथील गायतोंडे मैदानावर सभा होणार असून त्यानंतर दुचाकीवरून फेरी काढण्यात येईल.

त्यानंतर अवर लेडी चर्च नावेली येथे सभा होईल. त्यानंतर वेर्णा-पणजी मार्गे यात्रा म्हापसा येथे जाईल. म्हापशात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेला संघटनांचा पाठिंबा

राज्यातील सरकारी कामगार संघटनेने या यात्रेला आपला पाठिंबा जाहीर केला असून त्यांचे कर्मचारीदेखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सर्व समित्या तसेच इतर कामगार युनियनद्वारे या यात्रेला पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे या यात्रेची दखल घेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात समिती नेमण्यासाठी परिपत्रक काढले असल्याचे संघटनेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष सीताराम नाईक यांनी सांगितले.

Pension Scheme
Gomantak Home Ganesh Decoration Competition: अखिल गोवा पर्यावरणपूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा

या आहेत यात्रेच्या प्रमुख मागण्या

१ जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी.

२ ७व्या वेतन आयोगाप्रमाणे शिक्षकांना समान वेतन द्यावे.

३ विद्यादानाव्यतरिक्त इतर कामे शिक्षकांवर लादू नयेत.

४ नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे साधनसुविधा पुरवाव्यात.

Pension Scheme
Goa BJP: सत्तरीत स्त्री शक्तीचा जयजयकार, मेळाव्याला 26 हजारांची उपस्थिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest News
8th Pay Commission Latest Update
8th Pay Commission and One Rank One Pension for civilian employees
Agniveer Pension And Job Scheme Updates
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com