National Pension Scheme: सरकारी नोकरी न करताही पेन्शन हवी असेल तर.... ही बातमी तुमच्यासाठी

NPS: खाजगी नोकरी करत असताना अनेक वेळा म्हातारपणाचे टेन्शन आपल्याला सतावत असते. सरकारी कर्मचाऱ्याला सरकारकडून पेन्शन मिळते पण खासगी कर्मचाऱ्यांना अशी कोणतीही सुविधा मिळत नाही.
National Pension Scheme
National Pension SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

National Pension Scheme Benefits: तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर अनेकवेळा तुम्हाला तुमच्या म्हातारपणाची चिंता तुमच्या कुटुंबासह सतावत असेल. निवृत्तीनंतरही तुमचे मासिक उत्पन्न चालू राहावे असे तुम्हाला वाटते.

यासाठी तुम्ही अनेक बचतही केल्या असतील. तुम्ही नोकरी करत असताना सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते.

राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे काय?

ही योजना दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला निवृत्तीनंतर नियमित पेन्शनचा लाभ मिळेल.

ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. यामध्ये सरकार तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मोठा रिटायरमेंट फंड देते.

अर्ज कसा करायचा

यासाठी तुम्हाला तुमचे पेन्शन खाते उघडावे लागेल. तुम्ही हे तुमच्या नावाने तसेच तुमच्या पती/पत्नीच्या नावाने उघडू शकता.

यामध्ये, 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एकत्र किंवा दर महिन्याला पेन्शन म्हणून पैसे मिळतात.

National Pension Scheme
कॅसिनोवरील GST सह गोव्याची भीती वाढली; गुदिन्हो यांची CM सावंतांशी चर्चा, अर्थमंत्र्यांना लिहणार पत्र

किती गुंतवणूक करावी

तुम्हाला या योजनेत दरमहा किंवा वार्षिक गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही दरमहा 1000 रुपये देखील गुंतवू शकता. ही योजना तुम्ही वयाच्या ७० वर्षापर्यंत चालवू शकता. तुम्ही वयाच्या 60 वर्षांनंतर 60% पैसे काढू शकता.

जर तुम्ही वयाच्या ३० वर्षांनंतर या योजनेत गुंतवणूक केली आणि दरमहा ५,००० रुपये गुंतवले, तर वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्हाला जवळपास १.१२ कोटी रुपये मिळतील.

तुम्हाला दर महिन्याला गुंतवणुकीवर 10% परतावा मिळतो. वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्ही एकाच वेळी ६०% पैसे काढू शकता. याशिवाय तुम्हाला दरमहा ४५ हजार रुपये पेन्शन मिळेल.

National Pension Scheme
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल डिझेलच्या दरात किरकोळ बदल, जाणून घ्या आजचे दर

कर लाभ

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो. तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80(C) व्यतिरिक्त कलम 80CD(1B) अंतर्गत हा लाभ घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com