अदानी आणि अंबानी बघतच राहिले, ‘या’ अब्जाधिशाने झटक्यात कमावले 6 लाख कोटी

Jensen Huang: आता जगातील अब्जाधीशांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. लवकरच हा अब्जाधीश जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या लीस्टमध्ये येऊ शकतो.
Jensen Huang Net Worth
Jensen Huang Net WorthDainik Gomantak

Jensen Huang Net Worth: आता जगातील अब्जाधीशांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. लवकरच हा अब्जाधीश जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये येऊ शकतो. विशेष म्हणजे, या अब्जाधीशाने भारतातील दोन सर्वात श्रीमंत अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनाही मागे टाकले आहे. जेन्सेन हुआंग असे या अब्जाधीशाचे नाव आहे. ज्यांची कंपनी Nvidia जगात आपला दबदबा निर्माण करत आहे. या कंपनीच्या शेअर्संनी चालू वर्षात 173 टक्के आणि एका वर्षात 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

जेन्सेन हुआंग यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे एनव्हीडियाच्या शेअर्समध्ये झालेली वाढ. यामुळे जेन्सेन हुआंग चालू वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीत सर्वाधिक वाढ करुन अब्जाधीश बनले आहेत. चला तर मग Nvidia चे CEO जेन्सेन हुआंग यांची एकूण संपत्ती किती आहे आणि चालू वर्षात किती वाढ झाली ते जाणून घेऊया...

Jensen Huang Net Worth
Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

जेन्सेन हुआंगची एकूण संपत्ती किती आहे?

कम्प्यूटर प्रोसेसर आणि एआय टेकवर काम करणाऱ्या Nvidia कंपनीचे अध्यक्ष आणि CEO जेन्सेन हुआंग यांच्या नेटवर्थमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चालू वर्षात त्यांची एकूण संपत्ती 163 टक्क्यांनी वाढली आहे, म्हणजे 71.7 अब्ज डॉलर्स. भारतीय रुपयात पाहिले तर ही वाढ 6 लाख कोटी रुपये आहे. हेच कारण आहे की, सध्या ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार ते 116 अब्ज डॉलर्स झाले आहे. विशेष म्हणजे जेन्सेन हुआंग जगातील 11 व्या सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत.

संपत्ती कशी वाढली?

जेन्सेन हुआंग यांच्या संपत्तीत झालेली वाढ त्यांच्या एनव्हीडिया कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे झाली आहे. चालू वर्षात, Nvidia च्या शेअर्समध्ये 173 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, जर गेल्या एका वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, Nvidia चे शेअर्स 201 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 5 वर्षांत जेन्सेन हुआंगच्या कंपनीच्या शेअर्समध्ये 3380 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षात कंपनीच्या शेअर्संनी गुंतवणूकदारांना 28 हजार टक्के परतावा दिला आहे. जून 2014 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत $0.47 होती.

Jensen Huang Net Worth
Mukesh Ambani बनले जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली CEO; एलन मस्क आणि सुंदर पिचाई यांना सोडले मागे

अंबानी आणि अदानींना मागे टाकले

जेन्सेन हुआंग यांनी संपत्तीच्या बाबतीत आशियातील दोन सर्वात श्रीमंत अब्जाधीशांना मागे टाकले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर्स एवढी होती. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 107 अब्ज डॉलर्स आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात हुआंग यांच्या संपत्तीत 10 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 112 अब्ज डॉलरवरुन 113 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दुसरीकडे, गौतम अदानी यांची संपत्ती केवळ 107 अब्ज डॉलर्स इतकी आहे. याचा अर्थ कोणताही बदल झालेला नाही.

Jensen Huang Net Worth
Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानींना जीवे मारण्याची आणखी एक धमकी, आता मागितले २०० कोटी

टॉप 10 मध्ये हुआंग यांची लवकरच वर्णी लागणार!

हुआंग याच वेगाने पुढे जात राहिल्यास ते लवकरच टॉप 10 लिस्टमध्ये येऊ शकतो. असे झाल्यास जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफे टॉप 10 च्या लिस्टमधून बाहेर पडतील. सध्या वॉरन बफे यांची एकूण संपत्ती 134 अब्ज डॉलर्स आहे. याचा अर्थ हुआंग त्यांच्या मागे फक्त $18 अब्जनी आहेत. Nvidia च्या दोन ते तीन शेअर्समध्ये वाढ झाली तर हुआंग यांची संपत्ती 134 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते. त्यानंतर जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये त्यांचा समावेश होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com