Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Gold Price Hike: भारतात सण-उत्सव म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा मिठाईपुरते मर्यादित नसतात, तर हा काळ नवीन गोष्टी, विशेषतः सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.
Gold Price Hike:
Gold RateDainik Gomantak
Published on
Updated on

Gold Price Hike: भारतात सण-उत्सव म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा मिठाईपुरते मर्यादित नसतात, तर हा काळ नवीन गोष्टी, विशेषतः सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो. दरवर्षी दसरा, दिवाळी आणि लग्नाचा हंगाम सुरु झाला की, सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पण यंदाची गोष्ट थोडी वेगळी आहे.

सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या असून त्यामुळे ग्राहकांचा उत्साह काहीसा मंदावला आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,09,840 रुपये या विक्रमी पातळीवर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वात उच्चांक आहे.

Gold Price Hike:
Gold Rate: भारत-पाक तणावादरम्यान सोन्याची झळाळी झाली कमी! 'इतक्या' हजारांनी झाले स्वस्त, जाणून घ्या दर

विक्रमी दरवाढीने ग्राहकांना रोखले

गेल्या वर्षी (2024) सोन्याच्या (Gold) किमतीत 21% वाढ झाली होती, तर यावर्षी (2025) त्यात तब्बल 42 टक्क्याची मोठी वाढ झाली आहे. ही विक्रमी दरवाढ सामान्य ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम करत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहक आता सोने खरेदीपासून हात मागे घेत आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या (ET) रिपोर्टनुसार, तज्ज्ञांनी या दरवाढीमुळे चालू सणाच्या हंगामात सोन्याच्या मागणीत 10 ते 15% पर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही परिस्थिती सरासरी भारतीय कुटुंबांसाठी एक मोठी अडचण ठरत आहे, कारण अनेक घरांमध्ये सोन्याची खरेदी ही केवळ दागिन्यांपुरती मर्यादित नसून एक प्रकारची सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही पाहिली जाते.

Gold Price Hike:
Gold Rate: सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ, 24 कॅरेट सोने पोहोचले 1 लाख जवळ; चांदीनेही गाठला नवा उच्चांक

सणांवर सोने खरेदी का करतात?

भारतात (India) सोने केवळ एक दागिना नसून, ते शुभ, समृद्धी आणि गुंतवणुकीचे प्रतीक मानले जाते. दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीसारख्या सणांवर सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की, या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. याशिवाय, लग्नसराईच्या हंगामात तर सोन्याच्या दागिन्यांशिवाय लग्न अपूर्ण मानले जाते.

पण जेव्हा सोन्याचे दर इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचतात, तेव्हा लोकांना त्यांच्या गरजांचा पुन्हा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, जे लोक आधी 20 ग्रॅम सोने खरेदी करण्याचा विचार करत होते, आता ते फक्त 10 ग्रॅमपर्यंतच मर्यादित राहतील. मागणीतील ही घट थेट बाजारपेठेवर परिणाम करत आहे, ज्यामुळे विक्रेत्यांनाही चिंता वाटत आहे.

Gold Price Hike:
Gold Rate: सोन्याच्या किमतीत सलग पाचव्या दिवशी वाढ, दर वाचून चुकेल तुमच्या काळजाचा ठोका; नवा रेकॉर्ड नोंदवला

किमती का वाढत आहेत? सोन्याच्या किमतीतील या वाढीला अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे जबाबदार आहेत. प्रमुख कारणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढ: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत, ज्याचा परिणाम स्थानिक बाजारावरही होतो.

महागाई: जागतिक पातळीवरील वाढती महागाई लोकांना सोन्याकडे आकर्षित करत आहे, कारण महागाईमुळे चलनाची (Currency) किंमत कमी होते.

Gold Price Hike:
Gold Rate Goa : ऐन लग्नसराईत सोने महागले; ७३ हजार तोळा, चांदीची चमकही वाढली

जागतिक अनिश्चितता: सध्या जगभरात सुरु असलेल्या भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे (Economic Uncertainty) गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत.

डॉलरची मजबूती: अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे अनेक गुंतवणूकदार डॉलरऐवजी सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.

Gold Price Hike:
Gold Price Hike: ट्रम्प यांचा एक निर्णय अन् गोल्ड बनले 'रॉकेट', 3 दिवसांत सोन्याच्या किमतीत 'इतक्या' हजारांची वाढ

सणासुदीच्या काळात सोन्याला नेहमीच मोठी मागणी असते. पण यंदाची विक्रमी दरवाढ ग्राहकांचा उत्साह काहीसा कमी करत आहे. असे असले तरी, सोन्याला गुंतवणुकीसाठी आणि शुभ कार्यांसाठी दिले जाणारे महत्त्व कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com