Gold Rate: भारत-पाक तणावादरम्यान सोन्याची झळाळी झाली कमी! 'इतक्या' हजारांनी झाले स्वस्त, जाणून घ्या दर

Gold Price Drop After Operation Sindoor: शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 90,300 रुपये एवढा झाला. तब्बल 1500 रुपयांची घसरण झाली. त्याचवेळी, प्रति 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 11,500 रुपयांनी घसरुन 9,03,000 रुपये एवढी झाली.
Gold Rate
GoldDainik Gomantak
Published on
Updated on

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून दहशतवादी तळ उडवून दिले. यानंतर पाकिस्तानने भ्याड हल्ले करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ले केले, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला. यादरम्यान, एक दिलासादायक बातमी आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर शुक्रवारी (9 मे) सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली.

प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?

दरम्यान, शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 90,300 रुपये एवढा झाला. किमतीत तब्बल 1500 रुपयांची घसरण झाली. त्याचवेळी, प्रति 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 11,500 रुपयांनी घसरुन 9,03,000 रुपये एवढी झाली. गुरुवारी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली होती. प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 91,450 रुपये आणि 100 ग्रॅमचा भाव 9,14,500 रुपये एवढा होता.

Gold Rate
Gold Rate Today: सोन्याची झळाळी झाली कमी! किमतीत 'एवढ्या' हजारांची घसरण; जाणून घ्या दर अन् कारण

24 कॅरेट सोन्याचा भाव किती?

शुक्रवारी सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1250 रुपयांनी घसरुन 98,500 रुपये एवढा झाला. याशिवाय, प्रति 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 12,000 रुपयांवरुन 9,85,000 रुपयांपर्यंत घसरली. गुरुवारी प्रति 100 ग्रॅम 24 कॅरेटची किंमत 9,97,500 रुपये होती.

18 कॅरेट सोन्याची किंमत इतकी महाग झाली

सराफा बाजारात, 18 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 940 रुपयांची घसरण दिसून आली. अशा परिस्थितीत त्याची किंमत 73,890 रुपयांपर्यंत कमी झाली. त्याचवेळी, 18 कॅरेट प्रति 100 ग्रॅमची किंमत 9400 रुपयांनी घसरुन 7,38,900 रुपये झाली. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 90,300 रुपये तर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 98,500 रुपये एवढी आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 90,150 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 98,350 रुपये एवढी आहे.

Gold Rate
Gold Rate: सोन्याच्या किमतीचा नवा रेकॉर्ड! 88 हजारांचा टप्पा ओलांडला, एका दिवसात 2,430 रुपयांची वाढ

चांदीचा भाव किती?

शुक्रवारी 100 ग्रॅम चांदीची किंमत 9900 रुपये एवढी आहे. जर 1 किलो चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, हा दर 99,000 रुपयांपर्यंत खाली आला. शुक्रवारी देशभरातील विविध शहरांमध्ये 10 ग्रॅम चांदीचा दर 990 रुपये एवढा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com