Gold Price Hike: ट्रम्प यांचा एक निर्णय अन् गोल्ड बनले 'रॉकेट', 3 दिवसांत सोन्याच्या किमतीत 'इतक्या' हजारांची वाढ

Gold Price Hike India: ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम थेट दिल्लीत पाहायला मिळाला. दिल्लीत सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ नोंदवली गेली. विशेष म्हणजे, सलग तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली.
Gold Price Hike
Gold PriceDainiK Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफबाबत अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या औषध आणि चित्रपटांवर 100 टक्के कर जाहीर केला, ज्यामुळे पुन्हा एकदा जगात ट्रेड टॅरिफचे टेन्शन वाढले. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम थेट दिल्लीत पाहायला मिळाला. दिल्लीत सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ नोंदवली गेली. विशेष म्हणजे, सलग तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली. याचा अर्थ असा की, सोन्याच्या किमती पुन्हा एकदा उच्चांकावर पोहोचल्या.

दिल्लीत सोन्याचे भाव वाढले

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, ज्वेलर्स आणि शेअर बाजारातील सततच्या खरेदीमुळे मंगळवारी (6 मे) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 2,400 रुपयांनी वाढून 99,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोमवारी 99.9 टक्के शुद्धता असलेले सोने 97,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​क्लोज झाले. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही तेजी सुरु ठेवत मंगळवारी 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 2,400 रुपयांनी वाढून 99,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील बंद किंमतीत ते प्रति 10 ग्रॅम 96,900 रुपयांवर बंद झाले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ योजना जाहीर केल्यानंतर सुरक्षित वस्तूंच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या किमती वाढल्या.

Gold Price Hike
Gold Price: बजेटपूर्वीच सोन्याने केला मोठा धमाका, किंमतीचा नवा रेकॉर्ड; 85,000 चा गाठला टप्पा

बुलियन असोसिएशनच्या मते, चांदीचा भावही 1,800 रुपयांनी वाढून 98,500 रुपये प्रति किलो झाला. दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जूनमधील सर्वाधिक व्यापार झालेल्या सोन्याच्या वायद्यांचा भाव 1,951 रुपयांनी किंवा 2.06 टक्क्यांनी वाढून 96,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. जागतिक पातळीवर, स्पॉट गोल्डचा भाव 45.65 डॉलर्स किंवा 1.37 टक्क्यांनी वाढून 3,379.77 डॉलर्स प्रति औंस झाला.

Gold Price Hike
LPG Cylinder Prices Hiked: सर्वसामान्यांना मोठा झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

तीन दिवसांत सोने 4 हजार रुपयांनी महागले

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ दिसून आली. या तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याच्या किमतीत 1,080 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दिल्लीत सोन्याच्या किमतीत 550 रुपयांची वाढ झाली. आता मंगळवारी सोन्याच्या किमतीत 2,400 रुपयांची वाढ झाली. याचा अर्थ असा की, तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम 4,030 रुपयांची वाढ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com