Gold Rate Goa : ऐन लग्नसराईत सोने महागले; ७३ हजार तोळा, चांदीची चमकही वाढली

Gold Rate Goa : आठ दिवसांपूर्वी २४ कॅरेट सोने प्रतितोळा ७२,८०० रूपये होते, ते आता ७३, ४२० रुपयांवर पोहोचले आहे. आठ दिवसात प्रतितोळा ६२० रुपये वाढ झाली आहे. चांदी देखील ८४ हजारांवर किलो झाली आहे.
Gold Rate Goa
Gold Rate Goa Dainik Gomantak

Gold Rate Goa :

पणजी, उन्हाच्या झळांमध्ये सोने अधिक लखलखत आहे, कारण ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी २४ कॅरेट सोने प्रतितोळा ७२,८०० रूपये होते, ते आता ७३, ४२० रुपयांवर पोहोचले आहे. आठ दिवसात प्रतितोळा ६२० रुपये वाढ झाली आहे. चांदी देखील ८४ हजारांवर किलो झाली आहे.

त्यामुळे लग्नसोहळे असणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसत आहे. मल्टि कमोडिटी एक्सेंज पाठोपाठ सराफा बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत नवा उच्चांक गाढला जात आहे. एप्रिलमध्ये सोने तोळ्यामागे ५ हजारांहून अधिक दराने महाग झाले आहे, तसेच चांदी देखील ९ हजारांच्यावर महागली आहे.

वाढते दर काही स्थिर होण्याच्या स्थितीत नाहीत. परंतु यामुळे लग्न ठरलेल्या नागरिकांना दर महाग झाले, तरी दागिने, मंगळसूत्र, सोन्याची साखळी, अंगठी, तसेच इतर सौभाग्य अलंकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दर वाढून देखील खरेदी करावी लागत आहे. वाढलेल्या दरांमुळे सोन्याचा व्यापार काहीसा मंदावल्याच्या स्थितीत असून गरजू ग्राहक तेवढेच आता सोने खरेदी करताना दिसतात.

Gold Rate Goa
Goa Accident : राज्‍यात अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोन मित्रांनी गमावला जीव

सोन्याचे भाव

  कॅरेट ग्रॅम दर

  २४ कॅरेट १० ग्रॅम ७३,४२०

  २३ कॅरेट १० ग्रॅम ७०, ७६०

  २२ कॅरेट १० ग्रॅम ६८,६९०

चांदी

  १० ग्रॅम ८५०   १ किलो ८४,७३० रू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com