LPG Price: वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून भेट, LPG सिलेंडर स्वस्त, जाणून घ्या नवे दर

LPG Price: तेल कंपनीने या गॅस सिलिंडरच्या दरात थोडीशी घट केली आहे. नवीन किमती 1 जानेवारी 2024 पासून लागू झाल्या आहेत.
LPG Price
LPG Price Dainik Gomantak
Published on
Updated on

Gift from the government on the first day of the year, LPG cylinders have become cheaper, know the new rates:

मिठाईच्या दुकानांपासून लग्नसमारंभांपर्यंत वापरला जाणारा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून स्वस्त झाला आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 19 किलो LPG सिलिंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. सरकारी तेल कंपनीने या गॅस सिलिंडरच्या दरात थोडीशी घट केली आहे. नवीन किमती 1 जानेवारी 2024 पासून लागू झाल्या आहेत.

तथापि, स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या 14.2 किलो LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

याशिवाय आजपासून विमानांमध्ये वापरल्या जाणार्‍या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ इंधन) च्या किमतीतही बदल करण्यात आला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत काहीशी घट झाली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1755.50 रुपये झाली आहे. आधी 1757 रुपयांना मिळत होता.

मुंबईत हा सिलिंडर पूर्वी १७१० रुपयांना मिळत होता, तो आता १७०८.५० रुपये झाला आहे.

चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1929 रुपयांवरून 1924.50 रुपयांवर घसरली आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये हा गॅस सिलिंडर आता 1868.50 रुपयांऐवजी 1869 रुपयांना मिळत आहे.

LPG Price
सरकारकडून ओलाला नववर्षाची भेट ! PLI योजनेअंतर्गत सबसिडी मिळवणारी OLA ठरली पहिली कंपनी

विमान इंधनाच्या किमतीतही बदल

1 जानेवारी 2024 पासून विमान कंपन्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ किंमत) किमतींमध्येही बदल करण्यात आला आहे.

आता दिल्लीत ATF ची नवीन किंमत रु. 1,01,993.17/Kl झाली आहे. कोलकात्यात ही किंमत रु. 1,10,962.83/Kl, मुंबईत रु. 95,372.43/Kl आणि चेन्नईत रु. 1,06,042.99/Kl झाली आहे.

LPG Price
Financial Goals for 2024 : नवीन वर्षात आर्थिक नियोजनासाठी करा 'हा' महत्वाचा संकल्प

घरगुती सिलिंडरच्या किमती किती आहेत?

14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 30 ऑगस्ट 2023 रोजी त्याच्या किमती शेवटचा बदलण्यात आल्या होत्या.

मेट्रो शहरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत हा एलपीजी सिलिंडर 903 रुपयांना उपलब्ध आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये 929 रुपये, मुंबईत 902 रुपये आणि चेन्नईमध्ये 918 रुपयांना उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com