गॅस व आधारकार्ड जोडणीला 'अनिवार्य' म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्यास...एलपीजी डीलर्सना 'गोवा कॅन'चा इशारा

गॅस जोडणी आधार गॅसलिंक ग्राहकांना अनिवार्य नाही : गोवा कॅन
Gas and Aadhar Link
Gas and Aadhar LinkDainik Gomantak
Published on
Updated on

Gas and Aadhar Link: ग्राहक देत असलेल्या गॅसच्या किमतीमध्ये कोणत्याही सबसिडीचा समावेश नाही. त्यामुळे एलपीजी गॅस जोडणी आधार कार्ड लिंक करण्यास कोणत्याही ग्राहकाला सक्ती केली जाऊ शकत नाही, असे गोवा कॅनकडून ग्राहकांना उद्देशून सांगितले आहे.

Gas and Aadhar Link
Sunburn Goa 2023: 'हा तर सनातन धर्माचा अपमान!' सनबर्नमध्ये महादेवाचा फोटो वापरल्यामुळे आपचे अमित पालेकर आक्रमक

आधार कार्ड जोडणीअनिवार्य करण्यासंदर्भात कोणत्याही सरकारी प्राधिकरणाची अधिकृत अधिसूचना नाही. याबाबत माहिती सांगत असताना गॅस जोडणी व आधारकार्ड जोडणीला अनिवार्य' म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्यास किंवा 31 डिसेंबर 2023 पर्यंतची कोणतीही अंतिम मुदत लागू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्यातील भारतगॅस, एचपी गॅस व इंडेन गॅसच्या सर्व एलपीजी डीलर्सना गोवा कॅनने दिलेला आहे.

राज्यातील एलपीजी ग्राहकांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती केली जात असल्यास goacancomplaintscell@gmail.com वर तक्रार करण्याचे आवाहन गोवा कॅनतर्फे करण्यात आलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com