Financial Goals for 2024: 2024 उजाडायला अवघे काही तास शिल्लक आहेत. आपणं या नवीन वर्षात संकल्प काय करायचे हे आधीपासूनच ठरावले असणार. कदाचित ते 'छंद, भ्रमंती, वाचन' अशा खुमासदार विषयांवरचे असतील किंवा 'व्यायाम, गोड कमी खाण्यासारख्या' फिटनेस बाबतीतही असतील.
पण माझ्यामते प्रत्येकाने अर्थसाक्षरता हा संकल्प नक्कीच करावा. दिवसेंदिवस महागाई वाढत असून आपल्यासोबत कुटुंबाचं बजेट कसं आखावं हे प्रत्येकाने लक्षात घेणं आणि त्या दृष्टीने नियोजन करणं महत्वाचं आहे.
तुम्हाला कोणाला तरी दाखवायचे आहे म्हणून श्रीमंतीची लाइफस्टाइल पाहिजे की खरोखर सुखी, संपन्न, समृद्ध व समाधानी जीवन व्यतीत करायचं आहे हे आधी ठरवावं लागेल. तुम्ही नेहमी इतरांशी तुलना करत असाल तर तुमच्या पुढे कुणीतरी सदैव असणारच आहे हे कायम लक्षात असू द्या.
इतर कोणाशी तुलना करण्यापेक्षा आजच्या स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करायला हवी. कोणापेक्षा पुढे जायचं आहे यापेक्षा स्वतः मध्ये पूर्वर्वीपेक्षा किती सुधारणा आपण करतो आहोत हे महत्त्वाचे आहे.
अर्थसाक्षरता काय असते?
आर्थिक गोष्टी बहुतेक जणांना कंटाळवाण्या वाटतात. पैसे सर्वांना प्रिय आहेत पण त्याबाबतची साधी सोपी माहिती व्यवस्थितपणे घेतली जात नाही. तुम्ही अक्षर साक्षर आहात म्हणजे अर्थ साक्षर झालात असं होत नाही.
सोप्या भाषेत सांगायचं तर अर्थ + साक्षर = अर्थसाक्षर. अर्थ म्हणजे पैसा व तो कसे काम करतो हे समजून घेणं म्हणजे अर्थसाक्षरता! योग्य आर्थिक निर्णय घेऊन तुमची स्वप्ने, इच्छा, आकांक्षा वास्तवात आणण्यासाठी, अचानक उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्याचं धैर्य निर्माण करण्यासाठी, समृद्ध आणि समाधानी आयुष्य जगायला अर्थसाक्षरतेचा अभ्यास मदत करतो.
आर्थिक शिक्षण म्हणजे फक्त आर्थिक बातम्या वाचणे नव्हे. तुम्हाला देशाचा जीडीपी, अर्थव्यवस्थेची वाढ यांसारख्या गोष्टींची ताजी माहिती नसली तरी एक वेळ चालेल, पण आपल्या स्वतःचं आपल्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन कसं करावं याबाबतच्या काही गोष्टींची माहिती नक्कीच हवी.
सर्वसाधारणपणे तुम्हाला खालील बाबींची जाण असणं आवश्यक आहे.
उत्पन्न व खर्च याबाबत स्पष्टता - तुम्ही किती पैसे मिळवता व ते कसे, कुठे खर्च करता यांचे व्यवस्थापन.
आर्थिक ध्येये ठरवा.
बजेट तयार करा.
बचतीचे महत्त्व जाणा आणि लवकरात लवकर बचत करणं सुरु करा.
कर्ज घेणं ही गोष्ट कितपत आवश्यक आहे हे ठरावा आणि नंतरच कर्ज घ्या. कर्जाला कधीही कमी समजू नका. हप्ते वेळच्यावेळी कसे भरले जातील याकडे विशेष लक्ष द्या.
विम्याची अपरिहार्यता - आरोग्य विमा, मुदतीचा विमा आणि अपघात विमा अत्यावश्यक.
योग्य गुंतवणूक करणं.
आर्थिक फसवणुकीपासून बाळगायची सावधानता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.