RBI on Foreign Currency: बॅंक खातेदारांसाठी मोठी अपडेट, आरबीआयने घेतला मोठा निर्णय; या बँकेला...

Banking: भारतातील प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते आहे. लोकांना त्यांचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँक खाते आवश्यक असते.
RBI on Foreign Currency
RBI on Foreign Currency DaINIK Gomantak
Published on
Updated on

RBI on Foreign Currency: भारतातील प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते आहे. लोकांना त्यांचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँक खाते आवश्यक असते.

यातच, आता आरबीआयने एका बँकेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा बँकेवरही मोठा परिणाम होणार आहे.

वास्तविक, आरबीआयने बँकेला एक महत्त्वाची परवानगी दिली आहे, ज्याच्या मदतीने बँक (Bank) एक पाऊल पुढे काम करु शकेल.

परवानगी मिळाली

देशात अशा अनेक बँका आहेत, ज्या परकीय चलन विनिमयाचे काम करत आहेत. यासाठी आरबीआयची परवानगी घ्यावी लागते. तथापि, आतापर्यंत एयू स्मॉल फायनान्स बँकेकडे विदेशी चलन विनिमय व्यवसायासाठी परवानगी नव्हती. मात्र आता ही परवानगी देण्यात आली आहे.

RBI on Foreign Currency
RBI ने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांबाबत केला मोठा खुलासा, पुन्हा...!

ही बँक आहे

वास्तविक, एयू स्मॉल फायनान्स बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून परकीय चलन व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली आहे.

बँकेने बुधवारी दिलेल्या नियामक सूचनेमध्ये म्हटले आहे की, RBI ने 19 एप्रिल 2023 रोजीच्या आपल्या पत्रात परकीय चलन श्रेणी-I चे अधिकृत डीलर म्हणून काम करण्याचा परवाना मंजूर केला आहे.

RBI on Foreign Currency
RBI Repo Rate Hike: सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी, RBI गर्व्हनर यांची महत्वाची घोषणा....

लघु वित्त बँक

त्यानुसार आरबीआयकडून (RBI) मिळालेली ही परवानगी या संदर्भात लागू असलेल्या नियमांचे पालन करण्यावर अवलंबून असेल.

या लघु वित्त बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून संजय अग्रवाल यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करण्यास रिझर्व्ह बँकेने नुकतीच मान्यता दिली. ही नियुक्ती 19 एप्रिल 2023 ते 18 एप्रिल 2026 या कालावधीत लागू असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com