No Hike in RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी अशी माहिती दिली आहे.
आधीचाच रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार नाही. महागाई आटोक्यात येत असल्याने आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, महागाई आटोक्यात येत असल्याने आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आरबीआयचा रेपो रेट 6.50 टक्के आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून (RBI) पैसे घेते त्या दराला रेपो दर म्हणतात. रेपो दर वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे.
तर, रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते.
रेपो रेटचा काय परिणाम होउ शकतो
रेपो रेटमध्ये वाढ झाल्याने कर्जाचा हफ्ताही महाग होतो. यामुळे जर तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असेल तर त्याचा ईएमआय वाढेल.
दुसरीकडे रेपो रेटमध्ये वाढ झाल्यांतर बँक एफडीसह इतर ठेवींवर अधिक व्याज देऊ शकतात. म्हणजेच ठेवींचे दर वाढू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.