RBI ने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांबाबत केला मोठा खुलासा, पुन्हा...!

Currency Note Latest News: देशभरात नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत.
Currency Note
Currency NoteDainiok Gomantak
Published on
Updated on

Currency Note Latest News: देशभरात नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. जर तुम्हीही त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलल्या नसत्या तर आता तुमच्याकडे आणखी एक संधी आहे...

RBI (Reserve Bank Of India) कडून मोठी अपडेट समोर येत आहे. तुमच्या घरी अजूनही जुन्या नोटा आहेत का? जर असतील, तर जाणून घेऊया RBI कडून काय अपडेट आले आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) एक पत्र सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याबाबत सांगण्यात आले आहे. व्हायरल झालेल्या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, आरबीआयने विदेशी नागरिकांना भारतीय नोटा बदलून देण्याची सुविधा आणखी वाढवली आहे.

Currency Note
RBI Repo Rate Hike: सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी, RBI गर्व्हनर यांची महत्वाची घोषणा....

सत्य काय आहे

या पोस्टची चौकशी केली असता, गांभीर्य पाहून, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी फॅक्ट चेक) च्या फॅक्ट चेक टीमने या प्रकरणाची चौकशी केली आणि सत्य समोर आणले.

पीआयबीने या व्हायरल पोस्टची सत्यता तपासली आहे. PIB फॅक्ट चेकने म्हटले आहे की, विदेशी नागरिकांसाठी 500-1000 च्या जुन्या नोटा बदलण्याची सुविधा वाढवण्याचा दावा खोटा आहे.

Currency Note
FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, व्याजदरात होणार मोठी वाढ; RBI ने दिले संकेत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दाव्याबद्दल ट्विट करत ते म्हणाले की, परदेशी नागरिकांना भारतीय नोटाबंदीच्या नोटा बदलून देण्याची सुविधा 2017 मध्ये संपली आहे. 500 आणि 1000 च्या नोटा बदलण्याबाबत असा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com