Benaulim Fisherman Dainik Gomantak
Video

Benaulim Fisherman: बोट पार्किंगसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करा! बाणावलीतील मच्छीमारांची मागणी

Benaulim Fishing Boats: समुद्र किनाऱ्यावर मच्‍छीमार खात्‍याकडील ५ हजार चौ. मी. जागा होड्या ठेवण्‍यासाठी उपलब्‍ध करून द्यावी, अशी मागणी सरकारकडे करण्‍यात आली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: बाणावली येथील मच्‍छीमार ज्‍या खासगी जागेत आपल्‍या पारंपरिक होड्या उभ्या करून ठेवतात त्‍या जागेत ठेवलेल्‍या होड्या काढून घेण्‍याची नोटीस मच्‍छीमार खात्‍याने जारी केल्‍याने येत्या पावसाळ्यात या पारंपरिक होड्या कुठे ठेवाव्‍यात हा प्रश्न मच्‍छीमारांसमोर आ वासून उभा आहे.

समुद्र किनाऱ्यावर मच्‍छीमार खात्‍याकडील ५ हजार चौ. मी. जागा होड्या ठेवण्‍यासाठी उपलब्‍ध करून द्यावी, अशी मागणी सरकारकडे करण्‍यात आली आहे. फर्नांडिस यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, बाणावलीत एकूण १२४ मच्‍छीमारांच्‍या होड्या असून यातील ९४ होड्या मच्‍छीमार खात्‍याकडे नोंद झालेल्‍या आहेत. यापैकी ९ होड्या खासगी जागेत पार्क करण्‍यात आल्‍या होत्‍या, पण या जागेच्या मालकाने आपल्‍या जागेवर अतिक्रमण केल्‍याची तक्रार मच्‍छीमार खात्‍याकडे केली होती. त्‍यानंतर या ९ हाेडी मालकांना या जागेवरील होड्या काढून घ्‍याव्‍यात अन्‍यथा त्‍या मच्‍छीमार खात्‍याकडून जप्‍त करण्‍यात येतील अशा आशयाची नाेटीस आलेली आहे. या समस्‍येवर आता कायमस्‍वरूपी तोडगा काढण्‍याची गरज आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT