Black And White Podcast With Vijai Sardesai Dainik Gomantak
Video

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

Vijai Sardesai BJP attack: राज्यातील जनता भाजप सरकारला कंटाळली आहे, त्यांना यावेळी सत्तेबाहेर करायचे आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील जनता भाजप सरकारला कंटाळली आहे, त्यांना यावेळी सत्तेबाहेर करायचे आहे. यासाठी जनतेला भाजप विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि महाआघाडी करण्याची जनभावना असल्याचे मत गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. ते ‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘ब्लॅक ॲण्ड व्हाईट’ कार्यक्रमात बोलत होते.

सरदेसाई म्हणाले, चतुर्थीपूर्वी गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’मध्ये युती झालेली आहे. दोन्हीही पक्ष

भाजप विरोधात लढतील यात काही शंका नाही. त्यामुळे त्यांच्यासोबतची युती तुटण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. उलट ही युती वाढवायला आता चांगली संधी आहे. कारण विरोधकांमध्ये एका बाजूला गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ आहे, तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस आणि आरजी आहे. आरजी यापूर्वी कधीच युतीत सहभागी झाली नव्हती, त्यामुळे दोन गट एकत्र आल्यास अशक्य काही नाही. कॉंग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी महाआघाडीबाबत जे विधान केले आहे ते स्वागतार्ह्य आहे.

‘भाजप विरोधात एकत्र येण्यास आम्ही तयार’

जनतेला माझ्याकडून अपेक्षा अधिक आहेत हे मी जाणतो, त्या जनभावनेचा आदर राखत भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी आम्ही तयार आहोत. किमान-समान कार्यक्रम घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. भाजपने ‘वोट चोरी’ करून येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा कट रचला आहे. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे मोठे अस्‍त्र बनत आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी आम्हाला एकत्र येत रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल. यंदा निवडणूक तशी हलक्यात घेता येणार नसल्याचे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.

‘युतीधर्म मला शिकवू नये’

मी मागील पाच वर्षांपासून कॉंग्रेससोबत होतो, मला पहिल्याच दिवशी भाजपसोबत जाणे शक्य होते, परंतु तसे केले नाही. मी कॉंग्रेससोबत राहिलो. लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला, परंतु कॉंग्रेसचेच आमदार सत्ता गोटात गेले ही वस्तुस्थिती आहे. मला कॉंग्रेसचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. युती धर्म कसा पाळावा हे मला शिकवू नये, अशी भूमिका विजय सरदेसाई यांनी मांडली.

‘तालुकास्तरीय आराखड्याची गरज’

कॉंग्रेसने निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वी गोवा राखण यात्रा सुरू केली आहे. खरेतर यात्रा ही महिन्याभरापूर्वी काढणे उचित असते, परंतु या यात्रेने काही प्रमाणात प्रचाराच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही. या यात्रेत ‘आम्ही पणजीचे कॅसिनो बंद करू’ अशी विधाने केली जात आहेत, परंतु प्रत्यक्षात या गोष्टी शक्य आहेत का? याबाबतही विचार व्हायला हवा. कॅसिनो बंद पडल्यास अर्थकारणावर कोणता परिणाम होईल हे देखील पाहिले पाहिजे. गोव्याला राज्यस्तरीय प्रादेशिक आराखडा नव्हे, तर तालुकास्तरीय आराखड्याची गरज आहे आणि तालुकास्तरीय जनतेच्या अपेक्षेप्रमाणे आराखडा तयार करणे गरजेचे असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT