Ganja Seized Dainik Gomantak
Video

Taleigao Ganja Seized: ताळगावात गांजा बाळगल्याप्रकरणी ओडिशाच्या व्यक्तीला अटक

Ganja Seized: ताळगाव येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Squad) केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Manish Jadhav

ताळगाव येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Squad) केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी हा ओडिशा येथील असून त्याच्याकडून सुमारे 1.3 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या जप्त केलेल्या गांजाची किंमत 1.30 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना ताळगाव परिसरात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी लगेच त्याला अटक करुन त्याच्या विरोधात नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे गोव्यातील अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT