Suleman Khan Case Dainik Gomantak
Video

Suleman Khan: सुलेमान सिद्धीकी ठरतोय पोलिसांची डोकेदुखी

Suleman Khan Case Updates: सुलेमान खान याला पोलिस संरक्षणात घेण्यासाठी न्यायालयात आणले असता जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोठमोठ्याने ओरडून सांगत त्याने गोंधळ घातला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला आज पोलिस संरक्षणात न्यायालयीन कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयात आणले असता जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोठमोठ्याने ओरडून सांगत त्याने गोंधळ घातला.

तसेच त्याने लिखित सात पानांचा दस्तावेज माध्यम प्रतिनिधींकडे फेकला. यामध्ये त्याने १९९९ पासून आतापर्यंत भू-बळकाव प्रकरणातील राजकारणी, पोलिस तसेच सरकारी अधिकाऱ्यांशी झालेले संवाद तसेच सेटलमेंटसाठी देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचा उल्‍लेख केला आहे. मालमत्ता नावावर करण्‍यासाठी ज्‍योशुआ डिसोझा यांच्‍याकडून ५ कोटींची ऑफर होती, असे त्‍याने म्‍हटले आहे. सिद्दीकी हा भयंकर कावेबाज आहे; परंतु सातत्‍याने तो आरोप करत आहे. त्‍यावर किती विश्‍‍वास ठेवावा, असा प्रश्‍‍न निर्माण होत आहे. सुलेमानने प्रसार माध्यमांकडे फेकलेली कथित कागदपत्रे २० फेब्रुवारी २०२५ रोजीची असून ती मीडिया संघटनेला उद्देशून आहेत. त्यातील आशय असा- त्याने म्हापसा येथे अनेक मालमत्ता खरेदी करून त्या विकसित करून त्याची विक्री केली. १९९६ साली २०,८१९ चौ. मी. जमीन या परिसरातून खरेदी केली. त्यावर माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि मूळ जमीनमालकांच्या सह्या आहेत. १९९९ साली काही १२ लोक आपल्याकडे आले आणि त्यांनी ही जमीन विकत घेतली असल्याचे सांगितले. ही माहिती म्हापशाच्या तत्कालीन आमदारांना दिली असता, त्यांनी या लोकांना आपल्या घरी बोलावून घेतले व समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक बनलेल्या या नागरिकांनी त्यांना शिवीगाळ केल्याने ते निघून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3: मुख्यमंत्र्यांचे सचिव 'आयर्नमॅन', खडतर ट्रायथलॉनमध्ये मारली बाजी; संकेत आरसेकर यांनी पूर्ण केले तिहेरी आव्हान

'पर्यटकांना खोल्या, घरे भाड्याने देत असताना कागदपत्र तपासा'! द. गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांच्या सूचना; चोरीच्‍या घटनांमुळे प्रशासन सावध

Akshay Patra Yojana: ..आणखी 3 हजार विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’! माध्यान्ह आहाराचा मुद्दा; वाढत्‍या मागणीनंतर शिक्षण खात्‍याचा निर्णय

Curti Khandepar Panchayat: कुर्टी-खांडेपार नूतन पंचायतघराला 'रवीं'चे नाव! ग्रामसभेत ठराव एकमताने संमत

Dabolim Airport: ‘दाबोळी’ बंद करण्याचे गुदिन्होंचे प्रयत्न! विरियातोंचा आरोप; वास्कोतील उड्डाणपूल बनला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT