New Academic Year Goa Dainik Gomantak
Video

Goa Education: 90% शाळांमध्ये सुविधांचा अभाव, एप्रिलपासून शाळा हिताच्या; शैक्षणिक धोरणाबद्दल काय आहेत मते? पहा Video

New Education Policy Goa: विलास सतरकर यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण संचालनालय, शिक्षण सचिवांनी अनेकांशी चर्चा केली आहे.

Sameer Panditrao

New Academic Year In April Goa

पणजी : राज्यात एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने गरजेचा आहे. परंतु ९० टक्के शाळांमध्ये प्राथमिक साधनसुविधांचा अभाव आहे.

या अडचणींना आम्हाला सामोरे जावे लागेल, असे मत मुख्याध्यापक अनंत अग्नी यांनी व्यक्त केले. गोमन्‍तकच्‍या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात अग्नी बोलत होते. संपादक-संचालक राजू नायक यांनी त्‍यांच्‍याशी संवाद साधला. या कार्यक्रमात राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) समितीवरील अभ्यासक तथा मुख्याध्यापक विलास सतरकर, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सावियो व्हिक्टोरिया तसेच पालक सिसिल रॉड्रिगीस यांनी सहभाग घेतला.

विलास सतरकर यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण संचालनालय, शिक्षण सचिवांनी अनेकांशी चर्चा केली आहे. तालुकावार जाऊन निर्णय घेतले आहेत. आम्ही दहावी आणि बारावीच्या शिकवण्या यापूर्वी अनेक वर्षे एप्रिलमध्येच घेत आलो आहोत.

सिसिल रॉड्रिगीस यांनी सांगितले की, इयत्ता सहावीला ‘एनईपी’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मग इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये शाळेत का बोलावण्‍यात येत आहे? एप्रिलमध्ये शाळा असणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याने आमचा विरोध आहे.

एप्रिलमध्‍ये शाळांचा अट्टहास का? : सावियो व्हिक्टोरिया

नवीन शैक्षणिक धोरणानुसार वर्षाला २२० दिवस तर दिवसाला साडेपाच तास शाळेची वेळ असावी असे सांगण्यात आले आहे. राज्यात सद्यःस्थितीत त्याची पूर्तता होत असताना एप्रिल महिन्यात शाळा सुरू करण्याचा अट्टहास का केला जातोय? सध्‍याची योग्‍य असलेली शैक्षणिक पद्धत योग्य असताना तिच्यात बदल करणे गरजेचे आहे का? एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षक आणि पालकांना विश्‍वासात घेणे आवश्‍‍यक होते, असे उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सावियो व्हिक्टोरिया यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यायचे असेल तर आम्हाला एप्रिलमध्येही शाळा घ्याव्याच लागतील. त्‍याचे एक प्रमुख कारण हे देखील आहे की आपल्‍या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कॅलेंडरमध्ये लवचिकता असावी.
विलास सतरकर, ‘एनईपी’ समितीवरील अभ्यासक
नवीन शैक्षणिक धोरणाला आमचा विरोध नाही. परंतु या धोरणाची ज्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येते आहे, ती योग्य नाही. गोव्‍यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवतो. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे राज्यातील अनेक शाळांमध्ये आवश्‍‍यक साधनसुविधा नाहीत. शिक्षकांचीही कमतरता आहे.
सिसिल रॉड्रिगीस, पालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT