Panajim Traffic Dainik Gomantak
Video

Panajim Traffic: पणजीतील नवीन मांडवी पूल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी

New Mandovi Bridge: जुन्या मांडवी पुलाच्या डागडुजीनंतर आता नवा मांडवी पूल दुरुस्तीच्या कामासाठी २७ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : जुन्या मांडवी पुलाच्या डागडुजीनंतर आता नवा मांडवी पूल दुरुस्तीच्या कामासाठी २७ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दहा दिवसांच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक जुन्या पुलावरून वळवण्यात आली आहे. दरम्यान नवा मांडवी पूल परिणामी, वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नवीन मांडवी पूल बंद केल्यामुळं वाहतूक कोंडी झाली आहे.

१२ टनांपेक्षा कमी असलेली वाहनांना या जुन्या पुलावरून जाण्यास परवानगी असेल मात्र १२ टनाहून अधिक वजन असलेली वाहने अटल सेतू मार्गे वळवण्यात येतील. याबाबतचा सार्वजनिक बांधकाम खात्याने नुकताच आदेश जारी केला आहे.

बारावीची परीक्षा संपल्यानंतर नव्या मांडवी पुलाचे काम हाती घेण्यात येणार होते, मात्र पालक व विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळे १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसेल या अनुषंगाने हे काम लांबणीवर टाकण्यात आले होते. बारावी परीक्षा संपल्याने आता हे काम हाती घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT