Bicholim Sarvona Stream Dainik Gomantak
Video

Bicholim Sarvona: डिचोलीतील नैसर्गिक झऱ्याचे अस्तित्व 'धोक्यात'! कठडा खचला, प्रदूषणाचे संकट

Bicholim Sarvona Stream: औषधी गुणधर्म आणि नैसर्गिक जलस्रोत असलेली सर्वण गावातील नैसर्गिक ‘झर’ सध्या संकटात आली असून, ही झर जवळपास नामशेष होण्याच्या वाटेवर आहे.

Sameer Panditrao

डिचोली: औषधी गुणधर्म आणि नैसर्गिक जलस्रोत असलेली सर्वण गावातील नैसर्गिक ‘झर’ सध्या संकटात आली असून, ही झर जवळपास नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. निसर्गाचे वरदान असलेल्या या ‘झरी’च्या तोंडावरील कठडा खचला असून, पाण्याचा प्रवाह एकदम मंदावला आहे. झरीतील पाणीही आटले असून, झरीवर प्रदूषणाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या झरीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

डिचोली तालुक्यातील सर्वण गावातील श्री श्यामपुरुष मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर ही नैसर्गिक झर आहे. वाठादेव येथून या ‘झरी’चा उगम झाल्याचा जाणकारांचा दावा आहे. स्थानिक पंचायत किंवा अन्य यंत्रणा ही झर वाचविण्यासाठी पुढे येत नसल्याने, या झरीचे अस्तित्व संकटात आले आहे. नैसर्गिक देणगी असलेल्या या झरीच्या संवर्धनासाठी वेळीच प्रयत्न झाले नाहीत, तर ही झर नामशेष होणार यात तिळमात्रही शंका नाही. झर नामशेष झालीच, तर भविष्यात गावात ‘एक होती झर’ असे म्हणण्याची वेळ येणार आहे. आठ वर्षांपूर्वी जलस्रोत खात्याकडून निसर्गाचे वरदान असलेल्या या झरीची पाहणी करण्यात आली होती. पण अद्याप काहीच हालचाल करण्यात आली नाही.

स्थानिकांची झरीकडे पाठ

एकेकाळी म्हणजेच २५-३० वर्षांपूर्वी या झरीवर सदैव गजबज दिसून येत असे. गावातील लहानथोर मिळून बहुतेकजण आंघोळीसाठी या झरीवर जात होते. संध्याकाळच्यावेळी तर या झरीवर आंघोळीसाठी गर्दी दिसून येत होती. मात्र, झरीची देखभाल किंवा बांधणी करण्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने हळूहळू या झरीच्या प्रवाहावर परिणाम होत गेला. त्यातच दगड, माती आदी पालापाचोळ्यामुळे झर बुजत गेली. पाणीही प्रदूषित होत गेल्याने स्थानिकांनी हळूहळू या झरीकडे पाठ केली. आता तर या झरीवर कोणीच जात नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT