taxi drivers agitation Goa Dainik Gomantak
Video

मोपा विमानतळावर टॅक्सी चालकांचा एल्गार! 210 रुपये 'पिक-अप' शुल्कावरून राडा; प्रवाशांचे अतोनात हाल

Mopa Airport Taxi Protest: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी ऑपरेटर आणि विमानतळ व्यवस्थापन यांच्यातील वाद विकोपाला गेला

Akshata Chhatre

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी ऑपरेटर आणि विमानतळ व्यवस्थापन (GMR) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. जीएमआरने प्रत्येक टॅक्सीसाठी २१० रुपये पिक-अप शुल्क आकारण्याचा आणि त्यासाठी केवळ २ मिनिटांची वेळ मर्यादा देण्याचा निर्णय घेतल्याने टॅक्सी चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ चालकांनी विमानतळाचे मुख्य प्रवेशद्वार रोखून धरल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

टॅक्सी चालकांच्या या आंदोलनामुळे विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. टॅक्सींना पिक-अप झोनमध्ये प्रवेश मिळत नसल्याने अनेक पर्यटकांना आपले जड सामान घेऊन टर्मिनल इमारतीपर्यंत पायपीट करावी लागली. ऐन नाताळच्या सुट्ट्यांच्या काळात पर्यटकांची संख्या मोठी असताना, अशा प्रकारे निर्माण झालेल्या गोंधळामुळे गोव्याच्या पर्यटनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

टॅक्सी चालकांच्या मते, प्रवाशांचे सामान गाडीत भरणे आणि त्यांना व्यवस्थित बसवणे यासाठी किमान ५ ते १० मिनिटे लागतात. मात्र, जीएमआरने केवळ २ मिनिटांची मर्यादा दिली असून, त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क आणि वेळ मर्यादा दोन्ही अव्यवहार्य असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे विमानतळ परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT