Valpoi public transport Dainik Gomantak
Video

Kadamba Bus: वाळपईकरांची प्रतीक्षा संपली! पर्ये ते वाळपई 'KTCL' बससेवा सुरू; आमदार देविया राणेंच्या उपस्थितीत उद्‌घाटन

Kadamba Transport new route: पर्ये ते वाळपई मार्गे मोर्ले कॉलनीपर्यंत केटीसीएल (KTCL) बससेवेचा अखेर शुभारंभ झाला आहे

Akshata Chhatre

वाळपई: पर्ये ते वाळपई मार्गे मोर्ले कॉलनीपर्यंत केटीसीएल (KTCL) बससेवेचा अखेर शुभारंभ झाला आहे. पर्ये मतदारसंघाच्या आमदार देविया राणे यांच्या उपस्थितीत या बससेवेचे उद्‌घाटन करण्यात आले, ज्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना आणि स्थानिक रहिवाशांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. या नव्या बसमार्गामुळे कारंझोळ, वाळपई, होंडा, मोर्ले आणि साखळी यांसारख्या भागांतील रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक दिलासा मिळेल कारण त्यांना यापूर्वी वाहतुकीच्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. वेळेवर शाळेत पोहोचणे आणि घरी परतणे हे त्यांच्यासाठी नेहमीच एक आव्हान असायचे, मात्र आता ही बससेवा त्यांच्यासाठी एक वरदान ठरली आहे. या बससेवेच्या उद्‌घाटनासाठी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, केटीसीएलचे अध्यक्ष उल्हास तुयेकर आणि स्थानिक नेते उपस्थित होते. या बससेवेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि ग्रामीण भागातील लोकांना शहराशी जोडले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT