Makar Sankranti Market News Dainik Gomantak
Video

Makar Sankranti: नववर्षातील पहिल्याच सणावर महागाईचे सावट! बुडकुल्या, सुगडाचे दर वाढले

Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीच्या साहित्याने डिचोलीचा बाजार फुलला असून, तिळगूळ, तिळाचे लाडू आदी साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत.

Sameer Panditrao

डिचोली: ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश देणारा सण म्हणजे मकर संक्रांती. हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेला मकरसंक्रांती सण दोन दिवसांवर आल्याने, सध्या डिचोलीत सर्वत्र या सणाचा उत्साह आणि लगबग सुरू झाली आहे.

मकरसंक्रांती म्हणजे नववधूसह सुवासिनींचा उत्साह द्विगुणित करणारा सण. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बहुतेक घरोघरी हळदीकुंकू साजरा करण्यात येतो. मकरसंक्रांतीच्या साहित्याने डिचोलीचा बाजार फुलला असून, तिळगूळ, तिळाचे लाडू आदी साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत.

यंदा मकरसंक्रांतीला लागणाऱ्या साहित्याला बाजारात मागणी वाढण्याची शक्यता असली, तरी यंदा या सणावर किंचित महागाईचे सावट आहे. हळदीकुंकूसाठी लागणाऱ्या साहित्याची सध्या बाजारात खरेदी सुरु झाली असून, पुढील दोन दिवसांत खरेदीला जोर येण्याची शक्यता आहे.

सणांमधील मकरसंक्रांतीचे महत्त्व

नववर्षाचा पहिला सण अर्थातच मकर संक्रांती. या सणाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. हा सण सूर्य देवाशी संबंधित आहे. ज्यावेळी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्यावेळी हा सण साजरा करण्यात येतो. मकरसंक्रांतीनिमित्त भेटवस्तूही बाजारात दाखल झाल्या आहेत. मकरसंक्रांती ते रथसप्तममीपर्यंत घरोघरी ‘हळदीकुंकू’चे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र अलीकडच्या काळात या सणाची व्याप्ती वाढली असून, बदलत्या काळानुसार स्वरूपही बदलले आहे. भेटवस्तूही देण्यासाठी स्पर्धाही वाढत आहे.

साहित्याच्या दरात १०-१५ टक्क्यांनी वाढ

नववर्षातील या पहिल्याच सणावर यंदा महागाईचे सावट असून, मकरसंक्रांतीत साजरा करण्यात येणाऱ्या बहुतेक साहित्याचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. प्रथमच हळदीकुंकू करणाऱ्या नवविवाहित सुवासिनीना वाण म्हणून मातीच्या ‘बुडकुल्यां’ सह सुगड, असनीचे दोर आदी पारंपरीक वस्तू द्याव्या लागतात. यंदा 'बुडकुल्या' किंचित महाग झाल्या आहेत. ६०० ते ७०० रुपये शंभर नग असे बुडकुल्यांचे दर आहेत. तिळगूळ, वाटाण्यांचे दर स्थिर असले तरी तीळ महाग झाले आहेत.

२७० रु. किलो असे तिळाचे दर आहेत. साहजिकच तिळाचे लाडू किंचित ‘तिखट’ झाले आहेत. अलीकडच्या काळात अन्य भेटवस्तूप्रमाणेच कडधान्य देण्याकडे सुवासिनींचा कल आहे. त्यामुळे २०० ग्रॅम, पाव किलो, अर्धा किलो याप्रमाणे कडधान्याची पाकिटे तसेच साबण, उदबत्ती, प्लास्टिक आणि स्टीलची छोटी भांडीही बाजारात विक्रीस उपलब्ध झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT