Vijai Sardesai  Dainik Gomantak
Video

Kadamba EV Bus Drivers: 'हे' चालकही गोमंतकीय आहेत! कदंब बसचालकांच्या पगारावरुन सरदेसाईंची खरमरीत टीका

Electric Bus Drivers Meet MLA Vijai Sardesai: कदंब महामंडळातील १५० इलेक्ट्रिक बसचालकांना पगार वाढ करावी, अशी मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज केली. आज महामंडळातील इलेक्ट्रिक बसचालकांनी सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba EV Bus Driver Salary Issue

सासष्टी: कदंब महामंडळातील १५० इलेक्ट्रिक बसचालकांना पगार वाढ करावी, अशी मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज केली. आज महामंडळातील इलेक्ट्रिक बसचालकांनी सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या.

सरदेसाई यांनी सांगितले, की या चालकांना महिन्याला केवळ १६ हजार रुपये पगार दिला जातो. या उलट जे इतर चालक आहेत, त्यांना २२ हजार रुपये दिले जातात. कदंब महामंडळाचे चेअरमन व आमदार उल्हास तुयेकर सांगतात, की त्यांना २४ हजार रुपये पगार दिला जातो जे धादांत खोटे आहे किंवा चेअरमनची अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली असावी. एरव्ही इलेक्ट्रिक बसचालकांना जास्त पगार द्यायला हवा होता, पण तसे होत नाही. या चालकांना नियुक्ती पत्रेसुद्धा दिलेले नाहीत, ती त्यांना द्यावी. हे सर्व गोमंतकीय आहेत, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा सरकारला गोव्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा वाढविण्याची सूचना केली आहे. त्यादृष्टीने सरकारने इलेक्ट्रिक बसेसच्या सेवेत वाढ करावी, असेही सरदेसाई यांनी सांगितले. दरम्यान, हे सर्व चालक आपल्याला येऊन भेटले म्हणून सरकारने त्यांच्यावर सूड वगैरे उगवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही सरदेसाई यांनी शेवटी दिला.

मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते, की गोव्यात बाहेरील राज्यातील लोकांचा उद्योगधंदा व व्यवसाय वाढलेला आहे. या विधानाचा समाचार घेताना विजय सरदेसाई यांनी सांगितले, की हे विधान एरव्ही विरोधी पक्षाने करायला हवे होते. गोव्यात बाहेरील राज्यातील लोकांचा उद्योगधंदा व व्यवसाय वाढला तो कुणामुळे? गोव्यात सरकार कुणाचे आहे? बाहेरील राज्यातील लोकांचा व्यवसाय बंद व्हावा यासाठी सरकारने कोणती उपाययोजना केली आहे, असे प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: बांगलादेश हिंसाचार प्रकरणात शेख हसीना दोषी, न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

SCROLL FOR NEXT