Goa Rain: सत्तरीत पावसाचा जोर तसा कमी असला तरी वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होण्याचे सत्र सुरुच असते. मंगळवारी (दि.८) संध्याकाळी सोनाळ सत्तरी येथील रुक्मीणी गावस यांच्या घरावर तसेच गाडी ठेवण्याच्या शेडवर भले मोठे सायल्याचे झाड पडल्याने कार आणि स्कुटरचे मोठे नुकसान झाले आहे. वाळपई अग्निशमन दलाला कळविल्यानंतर जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. यात एकूण दीड लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून सुमारे तीन लाखाची मामलमत्ता वाचवण्यात जवानांना यश आले आहे.
दरम्यान खडकी सत्तरी येथे श्रीराम हायस्कूलजवळ रस्त्यावर आणि विज वाहिनीवर जंगली झाड पडून विज वाहिनीचे मोठे नुकसान झाले. केरी सत्तरी येथील अंजुणे धारणाजवळील चोर्ला बेळगाव मार्गावर रानटी झाड वीज केबलवर पडून वीज वाहिनीचे नुकसान झाले. त्याचबरोबर सातोडे सत्तरी येथे रस्त्यावर कोकमचे झाड पडण्याची घटना घडली. रिवे सत्तरी येथे रस्त्यावर आणि विज वाहिनीवर रानटी झाड पडून नुकसान झाले असून सोनाळ सत्तरी येथील मारुती मंदिराजवळ आंब्याचे झाड पडण्याची घटना घडली. अग्नीशमन दलातर्फे टप्याटप्याने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.