Harvalem Panchayat Election Dainik Gomantak
Video

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

Harvalem Panchayat Election: डिचोली तालुक्यातील हरवळे पंचायतीसाठी येत्या रविवारी २० ऑक्‍टोबर रोजी निवडणूक होत आहे. रिंगणात १२ उमेदवार असून ते आपले भवितव्य अजमावत आहेत. एका प्रभागातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता केवळ चार प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोली तालुक्यातील हरवळे पंचायतीसाठी येत्या रविवारी २० ऑक्‍टोबर रोजी निवडणूक होत आहे. रिंगणात १२ उमेदवार असून ते आपले भवितव्य अजमावत आहेत. एका प्रभागातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता केवळ चार प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयुक्त दौलतराव हवालदार यांनी अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी निवडणुकीची तयारी आणि व्यवस्थेचा आढावा घेतला.

हवालदार यांनी आज हरवळे पंचायतीला भेट दिली. मतदानासाठी स्थापन करण्यात आलेल्या मतदानकेंद्राची तसेच तेथील व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत निवडणूक सचिव वेनान्‍सियो फुर्तादो, निर्वाचन अधिकारी प्रवीण गावस, दत्तात्रय परब आदी अधिकारी उपस्थित होते. नंतर निवडणूक आयुक्त हवालदार यांनी डिचोलीतील निवडणूक कार्यालयाला भेट दिली. निवडणूक तयारीचा त्यांनी आढावा घेतला. हरवळे पंचायत निवडणुकीसाठी तयारी जवळपास पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्त दौलतराव हवालदार यांनी देऊन एकूण व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केले.

दरम्‍यान, या निवडणुकीबाबत संपूर्ण डिचोली तालु्‍क्‍याला उत्‍सुकता लागून राहिली आहे. राहिलेल्‍या चार प्रभागांतून कोण बाजी मारतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मतदानकेंद्रांची उभारणी

हरवळे पंचायतीची निवडणूक सुरळीतपणे होण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज बनली आहे. मतदानकेंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत. डिचोलीचे मामलेदार प्रवीण गावस यांची निर्वाचन अधिकारी म्हणून तर ए. के. दत्तात्रय परब यांची साहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२१ रोजी मतमोजणी

येत्या रविवारी २० ऑक्‍टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर, सोमवारी २१ ऑक्‍टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. त्‍या दिवशी दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल, अशी माहिती दौलतराव हवालदार यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Recruitment: 8व्या वेतन आयोगात नोकरीची बंपर संधी! पगार ऐकून व्हाल चकित, 'यंग प्रोफेशनल्स'ची चांदी

Horoscope April 2026: घाईने काम बिघडेल अन् पश्चाताप करण्याची वेळ येईल! 'या' राशीसाठी धोक्याची घंटा; 30 एप्रिलपर्यंत ग्रहांचे मोठे फेरबदल

Ayodhya Ram Temple: राम मंदिरातील 'ज्योती'वरुन रणकंदन! सोशल मीडियावर 'चिनी खेळणं' म्हणत ट्रस्टवर टीकेची झोड; नव्या वादाला फुटले तोंड

"आम्हाला असा पोप नको!" डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मगुरुंवर थेट हल्ला; इराण युद्धावरुन पोप लिओ चौदावे आणि ट्रम्प यांच्यात जुंपली

Goa Bank Fraud: बँक मॅनेजरच निघाला भामटा! 64.25 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल, ग्राहकांच्या नावे परस्पर काढले कर्ज

SCROLL FOR NEXT