harvale Panchayat Election  Dainik Gomantak
Video

Harvalem News: 'हरवळे'त काय होणार? 12 उमेदवार रिंगणात; 4 प्रभागांसाठी रणधुमाळी

Harvalem Panchayat: डिचोली तालुक्यातील हरवळे पंचायतीसाठी निवडणूक होत असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. हरवळे पंचायतीच्या चार प्रभागांसाठी निवडणूक होत असून १२ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Harvalem Panchayat Election

डिचोली: डिचोली तालुक्यातील हरवळे पंचायतीसाठी निवडणूक होत असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. हरवळे पंचायतीच्या चार प्रभागांसाठी निवडणूक होत असून १२ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. डिचोलीचे मामलेदार प्रवीण गावस निर्वाचन अधिकारी म्हणून, तर दत्तात्रय परब यांची साहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुकी करण्यात आली आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी मतदान केंद्रे सज्ज झाली असून मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्राचा ताबा घेतला आहे. प्रभाग-२ साठी (सरकारी प्राथमिक शाळा, वरचे हरवळे, उत्तर विभाग), प्रभाग-३ साठी (गणेश विद्यालय, हरवळे), प्रभाग-४ साठी (सरकारी प्राथमिक शाळा, प्रतापनगर - हरवळे) आणि प्रभाग-५ साठी (सरकारी प्राथमिक शाळा, वरचे हरवळे, दक्षिण विभाग) याप्रमाणे मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

१,६२१ मतदारांना हक्क

हरवळे पंचायतीत एकूण १ हजार ९९१ मतदारांची नोंद झाली आहे. चार प्रभागांतून प्रत्यक्षात १,६२१ मतदारांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. प्रभाग-२ मध्ये ४५३ (महिला - २२५ आणि पुरुष - २२८ मतदार). प्रभाग-३ मध्ये २९७ (महिला - १५२ आणि पुरुष - १४५ मतदार). प्रभाग-४ मध्ये ४९० (महिला - २६२ आणि पुरुष - २२८ मतदार). प्रभाग-५ मध्ये ४८१ (महिला - २३७ आणि पुरुष - २४४ मतदार) या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT