Sanquelim Temple Theft Dainik Gomantak
Video

Sanquelim Temple Theft: साखळी दत्तवाडीतील भंगलेल्या मुर्त्या विसर्जीत, आरोपींना जामीन मंजूर

Sanquelim Dattwadi Temple Theft: साखळी येथील श्री संस्थान दत्तवाडी मंदिरातील देवतांच्या पुरातन मूर्ती गायब प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Sameer Panditrao

डिचोली: साखळी येथील श्री संस्थान दत्तवाडी मंदिरातील देवतांच्या पुरातन मूर्ती गायब प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मूर्ती चोरल्याच्या आरोपावरून देवस्थानचे एक सदस्य श्याम बोडके आणि दीपेश कामत यांना काल (शनिवारी) डिचोली पोलिसांनी अटक केली होती.

आज दोन्ही संशयितांना विशेष न्यायालयासमोर हजर केले असता, तपासकामात पोलिसांना सहकार्य करावे. आदी अटींवर न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. दरम्यान, मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मंदिरात पडून असलेल्या मूर्ती धार्मिक परंपरेनुसार विसर्जित केल्या आहेत, असा दावा संशयित आरोपींच्या वकिलांनी केला आहे.

या प्रकरणी देवालय प्रशासक तथा डिचोलीच्या मामलेदारांनी केलेल्या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून श्याम बोडके आणि दीपेश कामत यांना अटक केली. मूर्ती चोरून नंतर त्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एक अलिशान मोटारगाडीही पोलिसांनी जप्त केली. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या श्री संस्थान दत्तवाडी मंदिरातून देवी अन्नपूर्णा, गणपती आणि मारुतीराय या तीन देवतांच्या पुरातन आणि मौल्यवान मूर्ती गेल्या मंगळवारपासून (ता. २४) गायब आहेत. मात्र, या मूर्तींची परस्पर विल्हेवाट लावून महाजन आणि भाविकांच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. असा दावा महाजनांच्या एका गटाचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT