Paddy Cultivation Dainik Gomantak
Video

Rice Farming: आनंदाची बातमी! गोव्यात भात उत्पादन वाढले..

Paddy Cultivation: २०१९-२० मध्ये ३४,६९८ हेक्टरमध्ये भात लागवड झाली होती. २०२३-२४ मध्ये हे क्षेत्र घटून ३२,४७७ हेक्टरवर आले. क्षेत्रफळ कमी असूनही भात उत्पादन वाढले आहे!

Sameer Panditrao

गोवा छोटे राज्य असले तरी येथे भातशेतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. कृषी संस्कृतीत भातशेतीचा ठसा आजही कायम आहे. २०१९-२० मध्ये ३४,६९८ हेक्टरमध्ये भात लागवड झाली होती. २०२३-२४ मध्ये हे क्षेत्र घटून ३२,४७७ हेक्टरवर आले. क्षेत्रफळ कमी असूनही भात उत्पादन वाढले आहे! २०१९-२० मध्ये १,३५,५६१ टन तर २०२३-२४ मध्ये तब्बल १,४२,०५६ टन भात मिळाला. गोव्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातशेती होते. रब्बी हंगामात तुलनेने कमी प्रमाणात लागवड होते. शासनाकडून बियाणे, अवजारे, संरक्षण कुंपणासाठी अनुदान मिळते. तरीही शेतकरी भातशेतीकडे कमी प्रमाणात वळत आहेत. पाच वर्षांत २,२२१ हेक्टर भातशेती क्षेत्र घटले आहे. उत्पादन वाढले तरी लागवडीत घट होणे ही गंभीर बाब ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT