wall collapse Goa school Dainik Gomantak
Video

Goa Rain: म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलची संरक्षक भिंत तिसऱ्यांदा कोसळली, वाहनांचे नुकसान; पावसाचा कहर

Mapusa Rain News: सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला

Akshata Chhatre

म्हापसा: सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. याच ठिकाणी भिंत कोसळण्याची ही तिसरी घटना आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत भिंतीजवळ पार्क केलेल्या तीन दुचाकींचे नुकसान झाले. तसेच, भिंतीला लागून असलेल्या एका घराच्या एका बाजूलाही संरचनात्मक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच म्हापसा नगरपालिकेच्या अध्यक्षा प्रिया मिसाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे भिंतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर आता पालिका प्रशासन काय उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: '..जगणं झालयां लाचार, आभाळ फाटलं', पर्जन्यराजा कोपला; गोव्यात शेती पडली आडवी

'PM मोदींची गाडी' वॉशिंग सेंटरमध्ये धुतली; ''सरकारी व्यवस्थेत शिस्त नाही का?'' Viral Video मुळे नेटकऱ्यांचा संताप

Goa Rain: धोका वाढला! गोव्‍यासह कोकणपट्ट्यात पाऊस झोडपणार; 2 कमी दाबाचे पट्टे सक्रिय

Goa Politics: 'आम्ही कोणाशीही युती करणार नाही', गोव्यात राष्ट्रवादीची एकला चलो रे भूमिका

Mapusa Bad Roads: ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ते?’ म्‍हापशात रस्‍त्‍यांना तळ्‍याचे स्‍वरूप; अर्धवट केबलिंगचा फटका

SCROLL FOR NEXT