Mahalaxmi in Goa Dainik Gomantak
Video

Goa Navratri: नगरगाव-सत्तरीसह गोव्यातील विविध भागांमध्ये सार्वजनिक महालक्ष्मीचे व्रत संपन्न

Mahalaxmi in Goa: नगरगावतील लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात गेल्या ३६ वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात अनेक वर्षांपासून नवरात्रीच्या काळात महालक्ष्मी पूजन केलं जातं. कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये लग्न झाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी महिलांकडून हे व्रत करण्याची परंपरा आहे. सुवासिनी एकत्र येत सकाळी देवीची पूजा करतात आणि संध्याकाळी महालक्ष्मीची मूर्ती पूजनासाठी तयार केली जाते. वैशिष्टय म्हणजे ही महालक्ष्मीची मूर्ती नेहमीच उभ्या स्वरूपात असते आणि यात कधीही बदल केला जात नाही. काही ठराविक माणसांकडून तांदळाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा बनवला जातो. व्रताच्या दिवशी संध्याकाळी ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत फुगड्यांच्या कार्यक्रमातून महालक्ष्मी जागवली जाते आणि पहाटे मुखवट्याचं विसर्जन करत, व्रताचं उद्यापन केलं जातं. नगरगावतील लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात गेल्या ३६ वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. केवळ नगरगावताच नाही तर गोव्यातील इतरत्र ठिकाणी देखील हा उत्सव साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live Updates: उबरसारख्या कॅब अ‍ॅग्रीगेटर्सना कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही - मुख्यमंत्री

Coconut: ..रावणाने भगवान शिवास आपली 10 शिरकमले अर्पण करण्यास प्रारंभ केला! समर्पणाचे प्रतीक 'नारळ'

Goa Assembly: ‘मोफा’ धर्तीवर सदनिकांचा प्रश्न सोडवणार! प्रसंगी वटहुकूमही जारी करू; मुख्यमंत्र्यांची हमी

Dovorlim Road: रस्ते दुरुस्त करा! दवर्लीत ‘आप’ची निदर्शने; आठवड्यात दुरुस्ती करण्याची मागणी

Cricketer Arrested: इंग्लंड दौऱ्यावर युवतीवर अत्याचार, स्टार खेळाडूला अटक; बोर्डाकडून तत्काळ निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT